नागपूर :- आदिवासी हलबा समाज विकास संस्थे तर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वार्षीक स्नेहमिलन कार्यक्रम रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी श्री गुरु कोलबास्वामी सांस्कृतीक सभागृह, जैसाव वाडी, टेलीफोन एक्सचेंज चौक, सी. ए. रोड, नागपूर येथे मनोहारराव वाकोडीकर यांच्या अध्यक्षात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्राविण दटके आमदार, कृष्णा खोपडे आमदार, डॉ. यशवंत बाजीराव माजी आमदार, विकासं कुंभारे माजी आमदार देवरांम नंदनवार अध्यक्ष, हलबा समाज महासंघ, विश्वनाथ आसई संयोजक, आदिवासी संघर्ष समिती, चंद्रभान पराते, अप्पर जिल्हादिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक संस्थेचे सचिव भास्कर चिचघरे यांनी केले. प्रास्तावीकात संस्थेच्या कार्याची माहिती संविस्तरपणे सचिवांनी दिली. उद्घाटनप्रसंगी पाहुण्यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले संस्थेने पंचवीस वर्षांचा कार्यकारळ पूर्ण करणे हे एक मोठे आव्हान आहे. त्याकरिता संस्थेचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे. संस्थे द्वारे राबविण्यात येणारे अनेक उपक्र जसे शैक्षणीक मार्गदर्शन शिबीर, आरोग्य शिबीर, करियर मार्गदर्शन शिबीर, जागतिक महिलादिन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करून समाजाचा गरीब विध्यार्थ्याना व महिलांना मुखयाप्रवाहात आणण्याचे कार्य करीत आहेत. संस्थेद्वारे अश्या प्रकारचे कार्यक्रम निःस्वार्थपणे राबवीत असतात. याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. असे पाहुण्यांनी मत व्यक्त केले. तसेच आमदार प्रविण दटके म्हणाले की या समाजाच्या हलबा जमातीचा प्रश्न अनेक वर्षा पासून प्रलंबित आहे. या करिता मा. मुख्यमंत्री सोबत माझी चर्चा झालेली आहे व या समाजाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे प्रयत्न होत आहे. याकरिता कृष्णा खोपडे व मी प्रयत्नशील आहोत. त्याच प्रमाणे संस्थेला जी मदत लागेल त्या पूर्ण करण्या करिता आम्ही प्रयत्नशील राहु असे आश्वासन आमदार प्रविणजी दटके व आमदार कृष्णा खोपडे यांनी दिले. त्याच प्रमाणे रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन संस्थे तर्फे करण्यात आलेले होते. रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त वार्षीक स्नेह मिलन कार्यक्रमाचे संचालन प्रशांत माताघारे यांनी केले तर आभार संगीता सोनक हिने मानले. कार्यक्रमात समाजातील मान्यवर तसेच समाजातील महिला, पुरुष व युवक युवतीनी मोठ्या संकेत भाग घेऊन विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचा आनंद घेतला. रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त वार्षीक स्नेह मिलन कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतलेत. असे भास्कर चिचघरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.
आदिवासी हलबा समाज विकास संस्थेच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक स्नेह मिलन कार्यक्रम संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com