कामठी विधानसभा क्षेत्रात मतदान यंत्रणा सज्ज

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आगामी 19 एप्रिल रोजी शुक्रवारला होणाऱ्या रामटेक लोकसभा निवडणूक अंतर्गत कामठी विधानसभा क्षेत्रात 508 मतदान केंद्राकरिता निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक ईव्हीएम मशीन सहित साहित्याचे वितरण करण्यात आले कामठी विधानसभा क्षेत्राचे निवडणूक अधिकारी सचिन गोसावी यांनी लोकसभा निवडणूक यशस्वीरित्या राबविता यावी याकरिता 508 मतदान केंद्रावर निवडणूक पार पडणार असून त्याकरिता मतदान निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) रोहिदास नगर कामठी येथे ईव्हीएम मशीन, बायलट युनिट, मतदार यादी सह विविध साहित्याचे वितरण करण्यात आले.

मतदान अधिकाऱ्यांनी साहित्य प्राप्त केल्यानंतर साहित्याचे चाचणी ,निरीक्षण करून साहित्य घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सज्ज झाले आहेत निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांचे मार्गदर्शनात जुनी कामठीचे ठाणेदार प्रशांत जुमडे ,नवीन कामठीचे ठाणेदार प्रमोद पोरे, मौदयाचे ठाणेदार राजपूत यांच्या मार्गदर्शनात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे ,निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडता यावी याकरिता निवडणूक अधिकारी सचिन गोसावी, कांमठीचे तहसीलदार गणेश जगदाळे ,मौदाचे तहसीलदार धनंजय देशमुख, नायब तहसीलदार योगिता दराडे ,नवनाथ कातकडे ,अमर हांडा ,राजाराम ब्रह्मनोटे, मयूर चौधरी, पृथ्वीराज साधनकर,अमोल पौड यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य

Thu Apr 18 , 2024
नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरीता मतदान ओळखपत्रासह (EPIC) 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरलेले आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा क्षेत्रात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरीता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे. त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com