‘अटल’ ऑनलाइन नोंदणी प्रणालीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

– आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी ‘अटल’ उपक्रम – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई :- शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळ्खण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ‘अटल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सीईटी सेलकडून सुरू करण्यात आलेल्या ‘अटल’ (ATAL – Assessment, Tests And Leaning) ऑनलाइन नोंदणी प्रणालीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, सीईटी सेलचे घनश्याम केदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, या उपक्रमाअंतर्गत मॉक टेस्ट्स आणि सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता येणार आहे. या सराव परिक्षांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर त्या विषयातील शैक्षणिक संधी आणि प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना येणारा ताण कमी होईल. शैक्षणिक आयुष्यात पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळेल. सायकोमेट्रिक टेस्टद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व त्यांच्या क्षमतांनुसार योग्य शैक्षणिक आणि व्यावसायिक विषयांची निवड करण्यास मदत होईल. हा उपक्रम केवळ परीक्षा तयारीपुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देणारा आहे.असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Thu Jan 16 , 2025
मुंबई :- राज्य शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटुंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी सन २०२३-२०२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्या-या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!