कोदामेंढी :- येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या धानोली उपकेंद्र अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या अडेगाव (पटाच्या) येथील ग्रामपंचायत कार्यालय आज दिनांक 12 डिसेंबर गुरुवारला दवाखाना आपल्या दारी अंतर्गत उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा लाभ 101 रुग्णांनी घेतल्याचे धानोली उपकेंद्रातील आरोग्य सेवक राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका बेबीनंदा गजभिये यांना मेसेज फॉरवर्ड करून व बेबीनंदा गजभिये यांनी सदर वार्ताहरला तोच मेसेज फॉरवर्ड करून सांगितले.
दवाखाना आपल्या दारी मध्ये बीपी ,शुगर व ईतर आजाराचे 51 रुग्ण तसेच सिकलसेल तपासणी 50 रुग्णांची करण्यात आली, असे एकूण 101 रुग्णांनी या कार्यक्रमाच्या लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धानोली उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी विशाखा कावळे, प्रा.आ. केंद्र कोदामेंढीतील आरोग्य सहाय्यक वैद्य , धानोली उपकेंद्रातील आरोग्य सेवक एम. जी.राऊत, आरोग्य सेविका तायडे, आशा गटप्रवर्तक सविता समरीत , डाटा एन्ट्री ऑपरेटर निमजे, अडेगाव आशा वर्कर सविता वासनिक यांनी परिश्रम घेतले.
दवाखाना आपल्या दारी या कार्यक्रमाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असते ,असे निमखेडा उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी तृप्ती शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिन या शासकीय सुट्टीच्या दिवशी धनी ग्रामपंचायतच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या दवाखाना आपल्या दारी या कार्यक्रमांमध्ये सांगितले. मात्र आडेगाव (पटाच्या) येथे आज 12 डिसेंबर गुरुवारला घेण्यात आलेल्या दवाखाना आपल्या दारी हा कार्यक्रम सकाळी दहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंतच गुंडाळण्यात आला, असे अडेगाव येथील वृत्तपत्राचे एजंट पैलेश मेश्राम यांनी सांगितले. त्यामुळे दवाखाना आपल्या दारी आणि कर्मचारी, अधिकारी वेळेपूर्वीच आपापल्या घरी अशी चर्चा अडेगावात सुरू होती.