अतिशय महत्वाच्या वाक्याने या लेखाची सुरुवात करतो. मी जे सांगतो तेच नेमके घडते म्हणून याठिकाणी अगदी खुलेआम राजकीय दृष्ट्या यादिवसात अतिशय वाईज अँड नाईस डिसिजन घेणाऱ्या त्या दोघांनाही अनुक्रमे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही मोलाचा सल्ला असा कि त्यांच्या हातून जी मोठी आणि नेमकी चूक त्यांचे मंत्री नेमताना घडली झाली ती चूक त्यांनी आत्ताच्या आता सुधारावी म्हणजे अजित पवार यांनी राष्ट्र्वादीतल्या त्याच त्या नेहमीच्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात काहीही झाले तरी अजिबात स्थान देऊ नये त्याऐवजी त्यांनी नव्या चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी द्यावी तसेच अगदी नाईलाजाने ज्या मोठ्या प्रमाणावर खाबुगिरी करणाऱ्या नेहमीच्या निर्लज्ज डाकू वृत्तीच्या सतत पैसे खाणाऱ्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळाचा स्थान द्यायचे आहे त्यांना देखील अगदी पहिल्या भेटीत निक्षून सांगावे कि जर तुम्हाला यापुढे कायमस्वरूपी शरद पवार यांच्या ऐवजी मला या राज्यातला आपल्या राष्ट्र्वादीतला परफॉर्मिंग सर्वोत्तम नेता म्हणून पुढे आणायचे असेल तर कृपया नागडे होऊन खाबुगिरी करण्याच्या फार भानगडीत न पडता नेमक्या विकासाच्या कामांकडे आणि कार्यकर्त्यांना जोडण्यात घडविण्यात लक्ष घालावे…
एकनाथ शिंदे सभोवताली तर अधिक भयावह वातावरण आहे. आम्ही तुमच्यासंगे उद्धव ठाकरे याना सोडले म्हणजे फार उपकार केले या भूमिकेतून त्यांच्या सोबतीने आलेले आमदार नामदार अक्षरश: त्यांनी खाबुगिरीच्या सार्या मर्यादा ओलांडल्या होत्या. अतिशय उज्वल राजकीय भवितव्य असणाऱ्या भविष्यात सत्तेच्या अधिक मोठ्या संधी असणाऱ्या तडफदार दिलदार एकनाथ शिंदे यांनी तर अजित पवारांपेक्षा अधिक सावध भूमिका घेत आणि बेरक्या खादाड असलेल्या निवडून आलेल्या नेहमीच्या आमदारांची फारशी भीडभाड न बाळगता किंबहुना त्यांच्या हातून अगदी अलिकडल्या काही वर्षात जी मोठी चूक झाली म्हणजे त्यांनी आपल्या शिवसेनेतून जे मंत्रिमंडळ नेमले होते त्यांनी बेधुंद होत खाबुगिरीच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या होत्या, माझ्या हाती जी नेमकी माहिती आली आहे ती अशी कि एकनाथ शिंदे हे निर्णय घेण्यात आणि राबविण्यात वाघ होते पण त्यांच्या समस्त आमदार नामदार मंडळींचा खाबुगिरीचा ग्राफ सत्तेच्या काळात अतिशय उंचावला होता ज्यावर भाजपा श्रेष्ठींची बारीक सूक्ष्म करडी नजर होती ज्याची जाणीव मी एकनाथ शिंदे यांना अनेकदा या ठिकाणी करून दिली असतांना देखील त्यांनी माझ्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना हि चूक भोवली, नव्याने मंत्री नेमताना ज्यांची खादाड वृत्ती मर्यादेपलीकडे नसेल त्यावर लक्ष केंद्रित करूनच शिंदे यांनी नेमक्या सुसंस्कृत आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लावावी ज्याचा साकारत्मक इफेक्ट त्यांना विशेषतः भाजपा श्रेष्ठींकडून नक्की बघायला मिळेल किंवा खबरदार जर बेधुंद होत भ्रष्टाचार केला तर, अशी तंबी देखील त्यांनी त्यांच्या नव्याने होणाऱ्या मंत्रीना द्यावी….
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपा मध्ये विनय सहस्त्रबुद्धे पद्धतीचे जे नामवंत नेते किंवा विचारवंत असतात त्यांना मंत्री मंडळातल्या ज्या चुका नेमक्या लक्षात येतात त्याची बारीक नोंद त्यांच्या श्रेष्ठींकडे पाठविल्या जाते. महायुतीच्या काळात या पाच वर्षात जर आहे तो भ्रष्टाचार 25 टक्क्यांनी कमी झाला तर पुढे अनेक वर्षे भाजपा महायुतीच्या हातून विरोधकांना सत्ता काढून घेणे कदापिही शक्य होणार नाही असे भाजपा तज्ज्ञांचे स्पष्ट मत असल्याने या पाच वर्षात विशेषतः एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्यांच्या गटाकडून व्यवहारात बऱ्यापैकी पारदर्शकता आणावीच लागणार आहे ज्याची सुमधुर फळे त्या दोघांना पुढे खूप वर्षे चाखायला मिळतील. बघा या समाजात दोन वेगवेगळ्या वृत्तीचे माणसे असतात म्हणजे एकांतात जर एखाद्याने चाकू दाखवून तुझ्याकडे जे आहे ते काढून मला दे सांगितले तर त्यातला चतुर माणूस एका झटक्यात स्वतःकडले सारे काही काढून देतो आणि दुसरा जर हट्टी आणि जिद्दी असेल तर तो झटापट झाल्यानंतर काही वेळाने आपल्याकडला ऐवज काढून देतो, अजित पवार चतुर होते, मुख्यमंत्री पदाबाबत त्यांनी लगेच भाजपाला पाठिंबा दिला पण एकनाथ शिंदे काहीसे हट्टी आणि जिद्दी त्यांनी जरासा विलंब केला पण फारशी कुरबुर न करता त्यांनी देखील भाजपाला पाठिंबा दिला थोडक्यात दोघांपैकी एकानेही स्वतःचा उद्धव ठाकरे करवून न घेतल्याने आता महायुतीमध्ये सारे काही आलबेल आहे आनंदाचे आणि हसण्या बागडण्याचे वातावरण आहे ज्याचा फार मोठा राजकीय फायदा नक्कीच एकनाथ शिंदे यांना व अजित पवारांना देखील होणार आहे हे उघड आहे. याच पंचवार्षिक योजनेत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री झाले तर फारसे नवल वाटून घेऊ नका किंबहुना त्या पद्धतीचे त्यांचे अमित शाह आणि मोदी यांच्याशी बोलणे झाले असावे अशी माझी शंका आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी