चोरीच्या सशंयाने गावकऱ्यांनी महिलां व पुरुषांना मारहाण करून केले गंभीर जख्मी

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत गहुहिवरा शिवारात गावकऱ्यांनी चोरीच्या संशयावरून १६ लोकांना लाठी काठीने आणि हातबुक्याने मारहाण करून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादीच्या तक्रारी वरून पोस्टे ला १० ते १५ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.२७) डिसेंबर ला सकाळी ६ वाजता दरम्यान १) रोहन विजु दुधे वय २८ वर्ष राह. रेल्वे पंचायत समिति समोर ताज दरगाह चे बाजुला कामठी यांचे सोबत त्यांच्या मोहल्यात राहणारे २) प्रवीण अमीर खान वय ३० वर्ष, ३) विना इशांत मासुरकर वय २२ वर्ष, ४) सुरेशा विजु दुधे वय ४३ वर्ष, ५) रोशनी आकाश संतापे वय २५ वर्ष, ६) कांचन संदिप वैरागडे वय २३ वर्ष, ७)  सीमा प्रकाश उईके वय ४० वर्ष, ८)  माया विकास उईके वय ३५ वर्ष, ९) शोभा बावनगडे वय ३० वर्ष, १०) कोमल किशोर सुखदेवे वय २५ वर्ष, ११) हर्षल प्रकाश उईके वय १९ वर्ष, १२) मनीष गणेश तळसे वय १९ वर्ष, १३) शाफिक सईद सलाम, १४) कपील कुंदन रंगारी वय १४ वर्ष, १५) विशाल संजय वैरागडे वय ३१ वर्ष, १६) सलमान हुसैन वय २० वर्ष सर्व राहणार रेल्वे पंचायत समिती समोर ताज दरगाह चे बाजुला कामठी हे निळ्या रंगाची बजाज मॅक्सीमा ऑटो क्र. एम एच ४० बी एफ १७८८ या वाहनाने अरोली येथे कबाडी साहित्य विणण्या करण्याकरिता गेले असता अरोली तसेच जवळपास चे निमखेडा, चाचेर, केरडी, निसतखेडा, गहुहिवरा गावात जाऊन कबाड जमा करून निमखेडा गावातील रेल्वे स्टेशन च्या बाजुला असलेल्या विक्रेत्याला कबाड विकुण जेवन करून सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान सर्व कामे निपटवुन लोकांना बजाज मॅक्सीमा ऑटो मध्ये बसवुन रोहन दुधे हे लोकांना सोबत घेऊन निमखेडा गहुहिवरा मार्गाने कामठी कडे जात असतांना निमखेडला काही इसमांनी रोहनच्या गाडीला बघुन रागात ओरडुन चोर चोर म्हणुन गाडीच्या मागे धाऊ लागले.

रोहनचा गाडी चालक सलमान हुसैन याने त्या लोकांना बघुन घाबरून गाडी तीव्र गतीने कन्हान कडे येत असतांना गहुहिवरा गावात १० ते १५ अनोळखी लोकांनी रोहन यांच्या गाडी सामोर ट्रॅक्टर उभा करून रोहन यांची गाडी थांबवली असता लोकांना पाहुन जोर जोरात हे लोक चोर आहे असे म्हणु लागल्याने वाहन मधिल लोक घाबरले. तेथील १० ते १५ अनोळखी इसमांनी हातात लाठी व काठी घेऊन मारायला सुरू वात केल्याने रोहन यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताच्या पंजाला जबर मार लागुन रक्त निघाले तर सोबत असणारे माया उईके,  विना मासुरकर , मा. प्रवीन खान , कोमल सुखदेवे , सीमा उईके , मनीष तळसे यांना सुद्धा लोकांनी लाठी, काठीने आणि हातबुक्याने मारहाण करून जख्मी केल्याने कपील रंगारी, विशाल वैरागडे, सलमान हुसैन हे आप ल्या लोकांना मार खात असतांना पाहुण शेतात पळुन गेले. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळ ताच पोलीस हवालदार जयलाल सहारे, सम्राट वनपर्ती हे आपल्या स्टाॅप सह घटनास्थळी गेले असता तेथील वातावरण शांत करून रोहन सह अन्य जख्मी लोकां ना घेऊन कन्हान ला आणले. कन्हान पोलीसांनी फिर्यादी रोहन दुधे यांचे तक्रारीने पोस्टे ला अज्ञात १० ते १५ आरोपी विरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक फुलझले हे करीत आरोपी चा शोध घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com