पोस्टे कळमेश्वर हद्‌दीतील पारडी बेडा गोंडखैरी येथे अवैधरित्या मोहाफूल गावठी दारू काढणाऱ्या इसमांवर कायदेशिर कार्यवाही

कळमेश्वर :- दि. २२/१०/२०२४ रोजीपो, स्टे. कळमेश्वर हद्दीत पारधी बेडा गोंडखैरी येथे अवैधरित्या गावठी पद्धतीने भ‌ट्टी लावून मोहाफूल गावठी दारू गाळणारे इसमांवर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु गाळणारे एकुण ०७ महिला आरोपी हे मोहाफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळुन आले. आरोपींचे ताब्यातून १) ७०२० लिटर मोहाफूल गावठी दारू कि ७०२०००/-रू. २) ३९०० लिटर मोहाफूल सडवा रसायन कि.१३६५००/-रू. ३) मोहाफूल गावठी दारू गाळण्याचे इतर साहित्य कि. १९८००/- रु ४) १५०० लिटर मोहाफूल रसायन भरलेले किंमती ५२५००/- रू. असा एकुण कि. ९१०८००/-रू चा मुद्देमाल मिळून आल्याने मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला.

महिला आरोपींविरुद्ध पो.स्टे कळमेश्वर येथे कलम ६५ (सी), (ई), (व) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर अनिल म्हस्के यांचे मार्गदर्शनातपोस्टे कळमेश्वर येथील ठाणेदार पोनि मनोज काळबांडे, सपोनि सविता वड्डे व इतर स्टाफ यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

85-85-85 चा फॉर्म्युला आला कुठून? कुणी केली मध्यस्थी?, बैठकीत काय काय घडलं?; संजय राऊत स्पष्टच बोलले

Thu Oct 24 , 2024
मुंबई :- विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी 288 जागा लढणारच आहे. काल नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, मी आम्ही सर्वांनी पवार यांची भेट घेतली. साधारण 85 जागांची आपली बोलणी नक्की झाली आहेत. ती तुम्ही जाहीर करा. उरलेल्या जागांवरती मित्रपक्ष, इतर काही ठिकाणांवर चर्चा सुरु आहेत. त्यावर आज संध्याकाळपर्यंत निकाल घ्यावाच लागेल. फार घोळ घालून चालणार नाही, असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com