उदय सामंत तुम्ही हे काय हो केले, चुकीचे वागले

आत्महत्या केलेल्या एका फार मोठ्या छंदीफंदी बाबाने माझ्या ओळखीच्या एका मूल न होणाऱ्या म्हणजे बॅटिंग मध्ये कमी पडणाऱ्या नवऱ्याला स्वतःचा फोटो असलेला गंडा देत थोडक्यात भक्ताला गंडवत सांगितले कि रात्रीच्या वेळी हा गंडा कंबरेला बांधून तयारीला लागा मूल नक्की होईल, भक्ताचे पैसा गेले तो बाबाही वर गेला पण मित्राच्या घरात पाळणा नाही हलला !! तुम्ही मात्र यादिवसातले माझे लिखाण व व्हिडीओज उशाशी ठेवत चला बघत चला, मी मात्र जे सांगणार आहे, तेच नेमके घडणार आहे. विधानसभा निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात होताच महायुतीमध्ये कुठल्या मतदार संघातून कोण कुठला पक्ष आणि उमेदवार निवडणूक लढविणार हे सर्वाधिक प्रथम ज्याच्या नावावर आणि पक्षावर शिक्कमोर्तब झाले ते महाशय होते शिंदे सेनेचे रत्नागिरी विधान सभा मतदार संघाचे उमेदवार उदय सामंत, लग्नाआधी अर्धा मधुचंद्र उरकून घेणाऱ्या अतिउत्साही आणि अनुभवी जोडप्यासारखे उदय सामंत यांचे झाले आहे, मतदानापूर्वीच ते निवडून आले आहेत असे समजायला अजिबात हरकत नाही. सामंत निवडणूक लढवतात आणि हमखास दरवेळी निवडूनही येतात, त्यांनी अख्खा संपूर्ण रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदार संघ पायथा घालून इतरांची प्रचाराला साधी सुरुवात देखील झालेली नसताना सामंतांनी मात्र निवडणूक प्रचाराचा मोठा पल्ला टप्पा केव्हाच गाठला आहे विशेष म्हणजे सामंतांना उमेदवारी म्हणजे शिंदे सेनेचा आणि महायुतीचा हा पहिला उमेदवार आजच निवडून आल्यात जमा आहे. अर्थात सामंतांना मतदार संघ प्रचाराची पूर्व तयारी झपाट्याने उरकणे यासाठी आवश्यक होती कारण त्यांच्या शिंदेसेनेत एकनाथजी आणि डॉ श्रीकान्त यांच्या खांद्याला खांदा लावून फार मोठी जबाबदारी अर्थातच उदय सामंत यांच्यावर टाकलेली असते आणि त्यांना ती पार करावीच लागते. उदय सामंत यांना अगदी सुरुवातीपासून मी ओळखतो अगदी जवळून बघतो, आधी ते राष्ट्रवादीत असतांना किंवा पूर्वीच्या एकमेव शिवसेनेत गेल्यानंतर दरवेळी दरठिकाणी हे त्या त्या वेळेच्या नेत्यांना सर्वाधिक जवळचे म्हणजे ते जसे शरद पवार अजितदादांच्या लाडके होते तेवढेच ते उद्धव ठाकरेंच्या विश्वासातले होते त्यामुळे आजही प्रत्येक पक्षात त्यांचा दबदबा आहे किंबहुना मंत्री असतांना त्यांनी हा आपला तो विरोधक असे काहीही न बघता कायम कामें घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला मनापासून सहकार्य मदत केलेली आहे तेच त्यांचे रत्नागिरी मतदार संघातले वागणे, खालची मान वर करून न पाहता थेट कर्ण पद्धतीने आपल्याकडले लुटून द्यायचे मतदारांसाठी सतत धावून जायचे त्यांना अंगवळणी पडलेली हि सवय म्हणून ते हमखास निवडून येतात आडवळणाच्या रत्नागिरीचे असूनही अख्या राज्यात उत्तम नेते म्हणून ओळखले जातात….

दीवार सिनेमा आठवत असेल त्यातला नायक अमिताभ जसा एकटाच गोडाऊन मध्ये अनेकांना भेटायला दोन हात करायला जातो तेच सामंतांचे, काल पर्वा ते असेच उठले आणि न घाबरता भीती संकोच न बाळगता परिणामांची चिंता न करता, महायुतीविषयी त्या मनोज जरांगे यांना एवढा मनात राग का, आणि रागाचे नेमके निरसन करण्यासाठी अचानक उठले त्यांनी आपले हेलीकॉप्टर बाहेर काढले तिकडे औरंगाबादला पार्क करून स्वतः कार चालवत जवळपास दोन अडीच तास प्रवास करून जरांगे मित्राच्या ज्या आडवळणाच्या फार्म हाऊसवर मुक्कामाला होते तेथे त्यांना थेट जाऊन भेटले त्यांना पाहून मनोज जरांगे देखील आश्चर्यचकित झाले त्यांच्यात छान चर्चा रंगली आणि समाधानी उत्तर घेऊन उदय सामंतांनी मुंबईत परतल्यानंतर नेमके रिपोर्टींग महायुतीच्या प्रमुख नेत्यांना केले तोपर्यंत येथे सारेच काळजीत, सामंत नेमके कसे असतील कोठे असतील त्यांना हि चिंता होती आणि हे महाशय इकडे जरांगेची भेट मस्त एन्जॉय करीत होते. रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यातल्या मतदारांनी उदय सामंत यांना सतत 25 वर्षे जिल्ह्यातला टॉपचा नेता म्हणून अगदी जवळून बघितले आहे, ज्याला जवळ केले त्याला कधीही सोडायचे नाही आणि ज्याला अंगावर घेतले त्यालाही कधी सोडायचे नाही संपवून मोकळे व्हायचे सामंतांचा हा स्वभाव त्यांना तोंडपाठ, या अशा बिनधास्त मनमोकळ्या उत्साही वृत्तीतूनच सारेच त्यांना सतत बिलगले असतात, सामंत त्यांचे अत्यंत आवडते नेते आहेत त्यांना निवडून येणे फारसे कठीण असे आव्हान नसते. सामंत आणि जरांगे यांची अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली भेट आणि चर्चा त्यातून महायुती सुखावली आहे तिकडे फासे उलटे पडले म्हणून शरद पवार मात्र सामंतांच्या नावाने कडाकडा बोटे मोडताहेत आणि मी हि बातमी गुप्तभेट तुम्हासमोर उघड केली त्याचे दूरगामी वाईट परिणाम आता मला नक्कीच भोगावे लागणार आहेत अर्थात तसेही जरांगेच्या ते लक्षात आले आहे कि आपल्या वागण्या बोलण्याचा उगाच मानसिक त्रास शिंदे फडणवीसांना होतो आहे, सामंतांच्या भेटीनंतर जरांगे 100 टक्के बदललेले तुम्हाला दिसतील. वास्तविक हे फार पूर्वी घडले असते म्हणजे अगदी हट्टाने उदय सामंत जरांगेच्या भेटीला गेले असते तर आजतागायतचे एवढे त्रासदायक रामायण घडलेच नसते. सामंत ज्यावर हात ठेवतात पुढल्या क्षणी ते त्या वस्तूला आपल्या ताब्यात घेऊन मोकळे होतात, माझ्या एका देखण्या मैत्रिणीचे त्यांच्याकडे महत्वाचे काम असूनही मी तिची आणि सामंतांची भेट होणार नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घेतो आहे. उद्या जर हेच मनोज जरांगे रत्नागिरी संगमेश्वर विधान सभा मतदार संघात उदय सामंतांसाठी प्रचार सभा घेतांना दिसले तर उगाच अचंबित होऊन नाचू गाऊ नका, एकनाथ, उदय यांचा नेमका हाच गेम त्या भेटीमागे दडलेला दिसतो, सामंत आणि जरांगे मैत्रीचे नवे पर्व नक्कीच सुरु झाले आहे…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जागतिक दर्जाचे शिक्षण द्या; पण मूल्येही शिकवा! - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Mon Oct 21 , 2024
–  विबग्योर समूहाच्या शाळेचे उद्घाटन नागपूर :- मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण द्या. त्यांना स्पर्धेच्या युगातील प्रत्येक नवी गोष्ट शिकवा. पण त्याचवेळी संस्कार आणि मूल्यांचेही शिक्षण द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले. पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या वतीने उत्तर अंबाझरी मार्गावर आयोजित कार्यक्रमात ना. गडकरी बोलत होते. विबग्योर समूहाच्या शाळेचे उद्घाटन ना. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!