▪️ नागपुरातील विविध गणेश मंडळांना भेट देवून फडणवीस यांनी घेतले दर्शन
▪️ मंडळांमध्ये लाडक्या बहिणींचा उत्साह
नागपूर :- राज्यातील गोर-गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांना चिंतामुक्त करुन त्यांच्या उन्नतीचे मार्ग समृद्ध कर अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गणेशाला प्रार्थना केली. नागपूर येथील विविध गणेश उत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाचे त्यांनी मनोभावे दर्शन घेतले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज शहरातील विविध सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली आबाल वृद्धांशी संवाद साधला.
प्नागपूर येथील प्रियदर्शनी नगर, गेडाम ले-आऊट, त्रिमूर्ती नगर, एल.आय.जी. कॉलनी, लोकसेवा नगर, न्यू सोनेगाव, पॅराडाईज सोसायटी, एच. बी. इस्टेट, भेंन्डे ले-आऊट, कैकाडी नगर, जयताळा, अमल तास लेआऊट, पूजा लेआऊट व विविध श्री गणेश मंडळांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देवून मंडळांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.
गणेशोत्सव निमित्त नागपूर महानगरात मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत असून विविध गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण जागृतीचे देखावे तयार केले आहेत. शासनाने दिलेल्या कायदा व सुव्यस्थेच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याला मंडळांनी प्राधान्य दिले आहे.