नागपूर :- मी सातत्याने लोकांमध्ये वावरत असल्याने सर्व नागरिकांच्या समस्यांची मला जाणीव आहे. या समस्या सोडविण्यासाठी मी 24 तास नागरिकांसाठी उपलब्ध होतो आणि पुढील काळातही परिवारातील सदस्य म्हणून सोबत राहणार.आज जनसंवाद यात्रा भुतेश्वर नगर भागात फिरून रतन कॉलनी येथे समाप्त झाली.यावेळी चिटणविस पुरा भागातील नागरिकांशी संवाद साधला.प्रभागातील नागरिकांनी रस्त्यांवर रांगोळ्या काढून यात्रेचे स्वागत केले.मला निवडून दिल्यावर मध्य नागपुरातील प्रत्येक व्यक्ती हा आमदास असेल असे प्रवीण दटके या वेळी म्हणाले.या जनसंवाद यात्रेला आमदार प्रवीण दटके,श्रीकांत आगलावे,गिरीश देशमुख, विनायक डेहणकर, बंडू राऊत,अनिल मानपुरे,नेहा वाघमारे, सुमेधा देशपांडे, विवेक सोनटक्के,प्रभाकर घुबे, सचिन नाईक, नरेश वाघमारे,मधुकर कांबडे,विनोद गवांडे,छोटू पवार,शिरीष राजे शिर्के, राजेंद्र नंदनकर, भाऊ पत्की,कैलाश गावांडे,सुमत लल्ला,दीपांशु लिंगायत, सोमु देशपांडे,धीरज चव्हाण, विनोद कनकदंडे,हर्षल घाटे,अंकुर थेरे,नंदू जाधव,भाजप पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी २४ तास सेवेत तत्पर….
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com