कोदामेंढी :- मौदा पंचायत समिती ,तारसा -चाचेर जि प क्षेत्र व तारसा प स गणाअंतर्गत येणाऱ्या तूमान येथे मंडई उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळी तर्फे दोन दिवसीय मंडई उत्सवाची सुरुवात उद्या शनिवार नऊ नोव्हेंबर लावणी सम्राजिनी नृत्यांगना अंकिता उपाध्याय यांच्या रात्री सात वाजता लावणीच्या कार्यक्रमाने होणार आहे.रविवार दिनांक 10 नोव्हेंबर ला दिवसभर देव्हाडा, तालुका मोहाडी ,जिल्हा भंडारा येथील शाहीर राजहंस भाऊ देवगडे विरुद्ध भागीमहारी ता पारशिवनी येथील शाहीर ज्ञानेश्वर भाऊ वाघमारे यांच्या राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील व परिसरातील पाहुणे मंडळींसह नागरिकांनी या दोन दिवसीय मंडळ उत्सवाच्या लाभ घेण्याचे आव्हान गट ग्रामपंचायत तूमान तरोडीचे सरपंच धम्मजीत गजभिये यांनी केले आहे.