नागपूर :- पोलीस आयुक्त, नागपूर शहर डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांचे संकल्पनेतुन नागपूर शहराला ड्रग्स फी नागपूर, वाहतुकच्या समस्या व नियमांचे पालन, तसेच सायबर जनजागृती अंतर्गत स्थापीत सायबर क्लबचे सदस्य यांचे माध्यमातुन अभियान सुरू आहे, याच अभियाना अंतर्गत चालू असलेल्या गणेशोत्सवात जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी याकरीता आज दिनांक १०.०९.२०२४. चे ११.३० वा. पोलीस मुख्यालय येथील अलंकार सभागृह येथे पोलीस आयुक्त, नागपूर शहर डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांचे अध्यक्षतेखाली नागपूर शहरातील शाळा, कॉलेज मधील एन.सी.सी. एन.एस.एस. आर.एस.पी, चे विद्यार्थी तसेच सायबर अॅम्बेसेडर यांचे करीता मार्गदर्शपर कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला होता.
पोलीस आयुक्तांनी नमुद कार्यक्रमाचा उद्देश समजावुन उपस्थित युवांना नागपूर शहराला सुंदर तसेच इग्स फी, सायबर समस्या फो व वाहतुक समस्या फी कसे करता येईल या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले व त्याकरीता सर्वांनी एकत्र येवुन काम करण्याची व जनजागृती करण्याबी आवश्यकता समजावुन सांगीतली, नागपूर शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सव दरम्यान उपस्थित सर्व युवा व सदस्य यांनी गणपती मंडळांना भेटी देवुन अंमली पदार्थांचे दुष्परिणाम व उपाय व वाहतुक नियमांचे पालन तसेच सायबर जनजागृती करावी असे आवाहन केले, तसेच येणाऱ्या गणपती विसर्जन बंदोबस्तामध्ये सर्वांनी स्वयंमस्फुर्तीने मदत करण्याचे आवाहन केले.
कार्यकमा दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी अंमली पदार्थों बाबत माहिती देवून त्याचे दुष्परिणाम व गुन्हे नियंत्रण उपाययोजना बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. याचप्रमाणे भरोसा सेलच्या महिला पोलीस निरीक्षक सिमा सुर्वे यांनी महिला सुरक्षा, कौटुबींक हिंसाचार व वरिष्ठ नागरीक या विषयावर मार्गदर्शन केले, सायबर सेलचे पोनि, अमीत डोळस यांनी सायबर सुरक्षा संदर्भाने घ्यावयाची खबरदारी तसेच उपाययोजना व कार्यवाही बावत मार्गदर्शन केले. सकाळ मिडीया ग्रुपचे श्रीकृष्णा शर्मा यांनी उपस्थित युवांना व्यक्तीमत्त्व विकास संदर्भाने मार्गदर्शन केले, रोटरी क्लब नॉर्थव्या अध्यक्षा मनिषा मुलानी यांनी सुध्दा नागपूर शहराला इग्स फी व सायबर फी करण्यासाठी मदतीचे आवाहन केले. याप्रसंगी मा. पोलीस आयुक्त यांनी एन.सी.सी चे कॅडेट्स यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याबाबत प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे देवुन त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोहवा. अतुल आगरकर यांनी तर आभार प्रदर्शन व्हाईस मिल कंपनीच्या फाऊंडर सोनाली नस्कीने यांनी केले. कार्यक्रमाकरीता नागपूर शहरातील शाळा, कॉलेज मधील एन.सी.सी. एन.एस.एस. आर.एस.पी, चे विद्यार्थी तसेच सायवर अॅम्बेसेडर, यंग ईस्प्रेशनल नेटवर्कचे सदस्य व बहुसंखेने विद्यार्थी, पोलीस अधिकारी व अंमलदार हे प्रामुख्याने उपस्थित होते.