‘ऑल इंडिया जमियतूल कुरैश’चे नितीन गडकरींना समर्थन

नागपूर :- ‘ऑल इंडिया जमियतूल कुरैश’ या कुरैश समाजातील सामाजिक संघटनेने नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ना. नितीन गडकरी यांना समर्थन जाहीर केले आहे. दि. १२ एप्रिलला गरीब नवाज नगर मैदानावर संघटनेचे अध्यक्ष अब्दूल गनी कुरेशी यांच्या नेतृत्वात ना. गडकरी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील निर्णय त्यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत जाहीर केला.

माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांनी अब्दूल गनी यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. नागपुरात बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी व नागपूरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ना. गडकरी यांच्या नेतृत्वाची नागपूरला गरज आहे. याशिवाय कुरैशी समाजाला व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नागपूरला ना. गडकरी यांच्या नेतृत्वाची गरज आहे, असे तळवेकर यांनी बैठकीत सांगितले. त्यानंतर रामटेकचे आमदार एड. आशीष जयस्वाल आणि बंडू तळवेकर यांच्या मार्गदर्शनात ना. नितीन गडकरी यांना समर्थन देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. १२ एप्रिलला होणाऱ्या सभेत संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हाजी बशीर कुरेशी (मुंबई), एड. मजीद कुरेशी (मलकापूर) आणि मोहम्मद साबीर कुरेश (पुलगाव) सभेला संबोधित करणार आहेत. या बैठकीला हाजी इकबाल कुरेशी, हाजी वकील कुरेशी, मीर साहब कुरेशी, दानीश कुरेशी, आसीफ कुरेशी यांचीही उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दूरसंचार विभागाची तोतयागिरी करणाऱ्या तसेच लोकांना मोबाईल नंबर वरील सेवा खंडित करण्याची धमकी देणाऱ्या कॉल्सविरूद्ध सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

Fri Mar 29 , 2024
– संचार साथी पोर्टलच्या ‘चक्षु-रिपोर्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन्स’ या सुविधेवर अशा प्रकारच्या फसवणुकीची तक्रार करण्याचे नागरिकांना आवाहन नवी दिल्ली :- ज्या नागरिकांना दूरसंचार विभागाच्या नावाने कॉल करून त्यांच्या सर्व मोबाईल नंबरच्या सेवा खंडित केल्या जातील अशी धमकी दिली जात आहे किंवा त्यांच्या मोबाईल नंबरचा काही बेकायदेशीर कामांमध्ये गैरवापर होत आहे, अशा नागरिकांसाठी दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने (DoT) मार्गदर्शक सूचना जारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com