महिला कॅाग्रेस महागाईविरोधात खर्चे पे चर्चा अभियान राबविणार – ॲड. नंदा पराते

नागपूर :- महाराष्ट्र प्रदेश महिला कॅाग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात महागाई संबंधी महिलांसाठी “खर्चे पे चर्चा” हा अभियान सुरू करण्यात आला, त्यासंबंधात नागपूर शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्ष ॲड. नंदा पराते याच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवन,महाल, नागपूर येथे महिला काँग्रेसच्या शहर कार्यकारणीच्या पदाधिकारींची व ब्लॅाक अध्यक्षांची “खर्चे पे चर्चा “ च्या नियोजनासंबंधी सभा झाली.

नागपूर शहर महिला काँग्रेस पदाधिकारींच्या सभेत शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते म्हणाल्या की भाजपा महायुती सरकाराने सणासुदीच्या दिवसात महागाई गगनाला भिडविली त्यामुळे सर्व सामान्य कुटूंबांचे गणित बिघडले. पेट्रोल , डिझेल, गॅस, भाज्या,धान्य व जिवनावश्यक वस्तू सर्वांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत त्यामुळे घर चालविणे गृहणींना कठीण झाले आहे. भाजपाकडून निवडणूकीच्या तोंडावर महागाई कमी करण्याचे आश्वासन देवून महिलांची फसवणूक केली जाते. महागाईमुळे सण,उत्सवांचा रंग फिका पडला आहे. या महागाईने जनता त्रस्त आहे म्हणून भाजप सरकारला जाग आणण्यासाठी नागपूर शहरात महिला कॅाग्रेसकडून “ खर्चे पे चर्चा” हा अभियान ठिकठिकाणी राबविण्यात येणार आहे.

भाजपा विरोधात नागपूर शहरातील महिलांमध्ये बेरोजगारी, महागाई व महिला सुरक्षा वर जागृती करण्यासाठी महिला कॅाग्रेसच्या “ खर्चे पे चर्चा “ या अभियानात हजारो महिलांना सहभागी करून हा अभियान यशस्वी करण्याचे मोहल्ला, वस्ती,कॅालोनी, प्रभाग, ब्लॅाक मध्ये अभियान सुरू करण्याचे नियोजन सभेत झाले. महिलांमध्ये प्रचंड महागाई वाढी विरोधात जन जागृतीचे “खर्चे पे चर्चा” या अभियानातून करण्यात येणार आहे. यासाठी प्रदेश महिला कॅाग्रेसच्या पदाधिकारी व शहर महिला कॅाग्रेसच्या पदाधिकारी यांनी महिलामध्ये जागृती मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी घेतल्याचे महिला कॅाग्रेस शहराध्यक्ष ॲड.नंदा पराते यांनी प्रसिद्घी पत्रातून म्हटले आहे.

महिला कॅाग्रेसच्या “खर्चे पे चर्चा “या अभियान नियोजनासाठी छाया सुखदेवे, पार्वती राठोड, शकुंतला वट्टीघरे, जयश्री धार्मिक, सुष्मा डांगे,ज्योती जरोंडे, मंजू पराते,नाजूका कारगावकर, पूजा देशमुख, गिता बावने, मंदा शेंडे, रेखा काटोले, पूजा बाबरा,विना दरवडे,पूनम अड्याळकर, कोमल वासनिक, प्रमिला बुरडे, माया नांदूरकर, गिता हेडाऊ माया धार्मिक यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५४वी बैठक संपन्न

Wed Sep 11 , 2024
– राज्याच्या वतीने मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती मुंबई :- वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५४वी बैठक ९ सप्टेंबर २०२४ रोजी सुषमा स्वराज भवन, चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला महाराष्ट्र राज्याच्या वतीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, गोवा आणि मेघालयचे मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!