डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपातर्फे अभिवादन

नागपूर :- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश भाजप उपाध्यक्ष प्रा. संजय भेंडे व ॲड. धर्मपाल मेश्राम, माजी आमदार डॉ मिलिंद माने, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष सतीश शिरस्वान यांनी संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी वंदन केले.

यावेळी शहर भाजप महामंत्री संदीप गवई, माजी सत्तापक्ष नेता संदीप जाधव, शंकर मेश्राम, इंद्रजीत वासनिक, महेंद्र प्रधान, हिमांशू पारधी, नेताजी गजभिये, राजेश हाथीबेड, रमेश वानखेडे, शंकरराव वानखेडे, संजय भगत, नितीन बक्सरिया, अजय करोसिया, रामकृष्ण भिलकर, अशोक मेंढे, पंजाबराव सोनेकर, दिलीप धोंगडे, सुधीर घोडेश्वर, कोमल वासनिक, अभिषेक टेंभुर्णे, आकाश बहादुरे, भरत चौरे, रुणाल चौहान, मनीष मेश्राम, संदीप बेले, राजू साळवे, श्रीकांत माटे, प्रवीण चौरे आदी उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करताना ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले, भारतासारख्या अनेक जाती, धर्म, भाषा, वेशभूषा, खानपान असलेल्या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक जीवनमूल्य रूजविणारे संविधान बाबासाहेबांनी या देशाला दिले. रांगेतल्या सर्वात शेवटच्या माणसाच्या उत्थानाचा लढा आपल्या कृतीतून आणि उक्तीतून बाबासाहेबांनी आदर्शवत या समाजाला दिला. भाकरा नांगल धरणाची मुहूर्तमेढ, वीजेचा विषय राज्याचा वा केंद्राचा का असावा, रिझर्व्ह बँकेची स्थापना यासह अनेक विषयांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला झिजवलं, या देशाला घडविण्यासाठी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन या देशाला समर्पित केले. बाबासाहेबांनी दिलेल्या या सन्मानाच्या आयुष्याची परतफेड करताना त्यांच्या विचारांची सर्वदूर रूजवणूक करून कायम ऋणात राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या रेट्यानंतर पत्रकारांच्या अभ्यास गटाची स्थापना !

Wed Dec 6 , 2023
– राज्य शासनाचा निर्णय ; समस्या मार्गी लागण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल – ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे करणार अभ्यास गटाचे नेतृत्व मुंबई :- पत्रकारांच्या मागण्या शासन दरबारी मांडून त्या तडीस नेण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या रेट्यामुळे महाराष्ट्र शासनाने पत्रकारांच्या मागण्यांसाठी अभ्यास करण्याकरिता एक अभ्यास गट स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्यस्तरीय अधिवेशन झाल्यानंतर जेमतेम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com