• प्रतिष्ठापना व पूजन करून केली सर्वमांगल्याची कामना
कोराडी :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी श्री गणरायांचे आगमन झाले. त्यांनी सहकुटुंब श्रींची प्रतिष्ठापना व पूजन केले. श्री गणेशाचे आगमन सर्वांच्या जीवनात आनंद व सुखाचे नवे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना करताना श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
ते शुभेच्छा देताना म्हणाले की, महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सामाजिक एैक्याची व समाज प्रबोधनाची, राष्ट्रभक्तीची, गौरवशाली एतिहासिक परंपरा आहे. ही परंपरा पुढे नेताना नागरिकांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गणेशोत्सव साजरा करावा. यंदाचा गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील माता, भगिणी व युवाशक्तीसाठी महत्वाचा आहे. निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा. सर्वांना गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पत्नी ज्योती, मुलगा संकेत, स्नुषा अनुष्का, नातीन काव्या, मुलगी पायल, जावई लोकेश आष्टनकर, नातू अधिराज व अविराज यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.