संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायतच्या माजी सदस्यावर एका महिलेच्या तक्रारी वरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचे नाव गजानन तिरपुडे रा येरखेडा कामठी असे आहे.ही घटना येरखेड्यात काल दुपारी साडे तीन दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विवाहित महिला ही येरखेडा येथील माहेरी आले असता आपल्या पतीला माहिती देण्यासाठी शेजारी गेले असता शेजारी उभे असलेल्या सदर आरोपीने त्या महिलेला फोन लावून देण्याचे सांगत तिला लज्जास्पद होईल असे शाब्दिक वर्तणूक करीत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सदर फिर्यादी महिलेने पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गजानन तिरपुडे विरुद्ध भादवी कलम 354 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.