पोलीस आयुक्तालय, पोलीस भवन येथे ‘ईद-ए-मिलाद २०२४” सणानिमित्त समन्वय बैठक संपन्न

नागपूर :-“ईद-ए-मिलाद २०२४” निमीत्ताने दिनांक ०५.०९.२०२४ से ११.३० वा. चे सुमारास, पोलीस आयुक्तालय, पोलीस भवन येथील ऑडीटोरियम हॉलमध्ये रविंद्रकुमार सिंघल, पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे अध्यक्षतेखाली  अश्वती दोर्जे सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, प्रमोद शेवाळे, शिवाजी राठोड, अपर पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे प्रमुख उपस्थितीत शरीतुल नयी कमीटी सोबत समन्वय बैठक आयोजीत करण्यात आलेली होती.

पोलीस आयुक्त यांनी बैठकीचे महत्त्व समजावुन उपस्थितांना येणाऱ्या ईद-ए-मिलाद सणानिमीत्त सर्वांनी शांतता व सलोखा अचाधीत ठेवुन कोणाच्याही भावना न दुखावता, वाहतुक व ध्वनी नियमांचे पालन करून सण साजरा करावा असे सुचविले, तसेच उपस्थित कमीटीच्या सदस्यांच्या अडीअडचणी समजुन त्यावर उपाययोजना व घ्यावयाची खबरदारी याबाबत तसेच, अंमली पदार्थ व त्याचे दुष्परीणाम याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यकमाचे सुत्र संचलन नरेंद्र हिवरे, सहा. पोलीस आयुक्त यांनी केले. श्वेता खोडकर, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा, नागपुर शहर यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी निमीत गोयल, अर्थात चांडक, राहुल मदने, निकेतन कदम,  शशिकांत साप्तव पोलीस उप आयुक्त, नागपुर शहर, तसेच, पोलीस अधिकारी व अंमलदार व बहुसंख्येने शरीतुल नबी कमीटीचे सदस्य हजर होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Fri Sep 6 , 2024
नागपूर :- फिर्यादी अंकीत राजु मंडपे, वय ३२ वर्षे, रा. कानफाडे नगर, वर्धा रोड, धंतोली, नागपूर यांनी त्यांची स्प्लेंडर मोटरसायकल क. एम.एच. ३१ डि.पी. २५७६ ही त्यांचे घरासमोर लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे धंतोली येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्‌ह्याचे समांतर तपासात गुन्हेशाखा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!