यवतमाळ तालुक्यातील 168 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी

– प्रोत्साहन लाभासाठी प्रमाणिकरण आवश्यक

यवतमाळ :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभासाठी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रमाणिकरण केले नसतील, त्यांनी प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आधार प्रमाणिकरणासाठी महाआयटीने दि.१२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्यासाठीचा लघुसंदेश महाआयटी मार्फत देण्यात आला आहे. तसेच याबाबत संबंधीत राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी देखील लाभार्थी शेतकऱ्यांना व्यक्तीशः कळविण्याबाबत संबंधित बँकांनाही सूचित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात 2 हजार 319 शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आधार प्रमाणिकरण केलेले नाही. जे शेतकरी या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र ठरले आहेत व ज्यांना विशिष्ठ क्रमांक देण्यात आला आहे, तथापि ज्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले नाही, अशा यवतमाळ तालुक्यातील आधार प्रमाणिकरण करिता बाकी असलेल्या 168 शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखांशी संपर्क साधावा व आधार प्रमाणिकरण तत्काळ करुन घेण्यात यावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक अनिल नाईक यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आर्णी येथे बहुजन कल्याणच्यावतीने महामेळावा

Tue Aug 27 , 2024
यवतमाळ :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी आर्णी येथील स्वर्गीय राजकमलजी भारती कला आणी वाणिज्य व श्रीमती सुशिला राजकमलजी भारती विज्ञान महाविद्यालयात महामेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला मार्गदर्शन तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.एन.ए. पिस्तुलकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.भुपाल राठोड, समालोचक डॉ.जितेंद्र कौशल्ये, कार्यक्रमाचे समन्वयक श्रीकांत वानखडे, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!