मुंबई :- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज विधानभवन येथे भेट देऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने विधानभवनातील लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस राज्यपाल यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सचिव (१) कार्यभार जितेंद्र भोळे उपस्थित होते.