– दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार
नागपूर :- दहावीच्या परीक्षेत चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणे ही प्रत्येक विद्यार्थासाठी आनंदाचीबाब असते, आपल्या परिश्रमातून घवघवीत यश संपादन करून मिळालेल्या आनंदाला विद्यार्थांनी पुढील वाटचालीसाठी प्रेरणा म्हणून बघायला हवे, असे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत नागपूर महानगरपलिकेच्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले आहे. मनपा मुख्यालयातील आयुक्त बैठक कक्षात मंगळवारी (ता.२८) दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विद्यार्थांना मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, दहावी, बारावीची परीक्षा ही विद्यार्थांच्या करियरसाठी एक महत्वाचे पाऊल असते, आपली पुढील वाटचाल याव परीक्षांवर अवलंबून असते, त्यामुळे आपल्यासाठी उत्तम क्षेत्र निवडताना विद्यार्थांनी विचारपूर्वक आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे आणि निवडलेल्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करावे, पालकांनी देखील विद्यार्थाला आवड असणाऱ्या क्षेत्रात त्यांना कार्य करण्याची संधी द्यावी. असेही डॉ. चौधरी म्हणाले.
तर अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच बारावीच्या परीक्षेत देखील विद्यार्थांनी असेच यश संपादन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी उपायुक्त प्रकाश वराडे व मनपा शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक तसेच प्राविण्य प्राप्त विद्यार्थांचे पालक उपस्थित होते.
मनपाच्या शाळांचा निकाल ८७.५९ टक्के एवढा लागला आहे. यात मराठी माध्यमाचा निकाल ८९.३५ टक्के तर हिंदी माध्यमाचा निकाल ८१.४५ टक्के, उर्दू माध्यमाचा निकाल ९८.६१ टक्के आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल ८८.६३ टक्के लागला आहे. याशिवाय मनपाच्या ०८ शाळेंचा निकाल शंभर टक्के लागला असून, 11 शाळांचा निकाल ९० टक्केच्या वर, तर ०६ शाळांचा ७५ ते९० टक्के दरम्यान निकाल लागला आहे.
मनपाच्या मराठी माध्यमातून अथर्व सुधीर गायनेवार याने ९५.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तर हिंदी माध्यमातून आर्यन शाह याने ८४.६० टक्के गुण मिळावीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. उर्दू मध्यामातून शीफा परवीन मो. नाजीर अहमद हिने ८६.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. इंग्रजी माध्यमातून जारीया सय्यद अजय आली सय्यद हिने ८७.६० हिने गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांमधून धनश्री निळकंठ वट्टी हिने ८३.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तर अथर्व सुधीर गायनेवार याने ९५.८० टक्के गुण मिळवत मागासवर्गीय विद्याविद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
मनपाच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल मनपाचे शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे संचालन उपशिक्षणाधिकारी सुभाष उपासे यांनी केले. आभार उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सुके यांनी मानले या वेळी उपशिक्षणाधिकारी संजय दिघोरे व शाळेचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापीका टेरेसा जार्ज, अनिल बच्चुवार, गिता दांडेकर, श्याम गोहोकर, लता कनाटे, वंदना महाजन, नसीम बानो, माधुरी काटकर, ज्योती काकडे, मोहन करणकर इत्यादी उपस्थित होते.
मनपा माध्यमनिहाय प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी
*मराठी माध्यम*
अथर्व सुधीर गयनेवार -दुर्गा नगर माध्य. शाळा
श्वेता श्रीकृष्ण कोरे- जयताळा माध्य. शाळा
संपदा अरविंद खांडेकर- जयताळा माध्य. शाळा
*हिंदी माध्यम*
आर्यन दिपक शाह – पन्नालाल देवडीया माध्य. शाळा
प्रवीण विजय वर्मा – संजयनगर माध्य. शाळा
रविना रामकुमार सेलोकर -संजयनगर माध्य. शाळा
निशा अमीरका पासवान -लाल बहादुर शास्त्री माध्य. शाळा
*उर्दू माध्यम*
शीफा परवीन मो. नाजीर अहमद- गरीब नवाज माध्य. शाळा
बुशरा बानो मो. अनीस-एम.ए.के. आझाद माध्य. शाळा
झहेदा खातून मुजीबुल्लाह सिद्दीकी-ताजाबाद माध्य. शाळा
*इंग्रजी माध्यम*
जारीया सय्यद अजय अली सय्यद- जी. एम. बनातवाला माध्य. शाळा
शिझा शफीक शाहीद खान- जी. एम. बनातवाला माध्य. शाळा
मुग्धा धीरज गजभिये- जी. एम. बनातवाला माध्य. शाळा
*दिव्यांग विद्यार्थ्यांमधून प्रथम*
धनश्री निलकंठ वट्टी-डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्य. शाळा
मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम
अथर्व सुधीर गयनेवार -दुर्गा नगर माध्य. शाळा