– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 26:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढा मार्गावर असलेल्या सोनी ज्वेलर्स नामक सोन्या चांदीच्या दुकानात महिला आरोपीनी तांब्याच्या धातू असलेल्या गहू मण्यांच्या मंगळसूत्राला सोन्याच्या रंगाचे पॉलिश चढवून ते मंगळसूत्र सोन्याचे दागिने असल्याची खोटी बतावणी करून हे दागिने गहाण ठेवायला आले असता यासंदर्भात दुकानात उपस्थित व्यापाऱ्याने त्या दागिन्याची बारकाईने तपासणी केल्यावर सदर दागिने बनावट असून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच व्यापारि दुकानदाराने या महिला आरोपीला गोष्टीत गुंतवून ठेवत हळूच पोलिसांना माहिती दिली.दरम्यान स्थानिक जुनी कामठी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी भेट देऊन फसवणूक होणाऱ्या घटनेचे गांभीर्य जाणून घेत होणारी फसवणुकीची घटना टाळली.ही घटना 24 फेब्रुवारीला दिवाढवळ्या 2 वाजता घडली असून फिर्यादी अंकुश मधुकरराव कुर्वे रा मोंढा रोड कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून नागपूर कुकडे ले आउट रहिवासी महिला आरोपीवर त्वरित भादवी कलम 420, 511 अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली तसेच या प्रकरणातील अजून एका महिला आरोपीला आज दुपारी 2 दरम्यान अटक करण्यात आली असून यामध्ये मोठी टोळी पोलिसांच्या हातात लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Next Post
चिकन मटण विक्रेत्याचा लुबाडणुकीचा प्रयत्न फासला
Sat Feb 26 , 2022
– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 26:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गोयल टॉकीज चौकातून स्वतःच्या दुचाकीने घरी जात असलेल्या एका चिकन मटन विक्रेत्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून , त्याला मारझोड करीत त्याच्याकडे असलेली पैस्याची बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची घटना काल रात्री साडे 10 दरम्यान घडली मात्र वेळीच भीतीपोटो या मटण विक्रेत्याने मदतीची याचना करीत मोठ्याने […]

You May Like
-
March 16, 2023
भाजपा प्रवक्त्यांसाठी शुक्रवारी अभ्यासवर्गाचे आयोजन
-
November 26, 2022
नवयुवक उच्च प्राथमिक शाळा कामठी येथील विद्यार्थांनी काढली संविधान रॅली
-
January 28, 2022
युवा समाजसेवी अरविंदकुमार रतूड़ी समाज रत्न भूषण सम्मान से सम्मानित
-
August 25, 2023
धनादेशाने वीज देयकाचा भरणा करतांना काळजी घ्या