संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- उन्हाळ्यात शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाल्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत गादा गावचे सरपंच सचिन डांगे यांचे मार्गदर्शनात भर उन्हाळ्यात गादा गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरात 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरच्या वतीने रक्त संकलन केले रक्तदान शिबिराच्या रक्तदान शिबिरात सरपंच सचिन डांगे ,उपसरपंच मोहन मारबते, सुरज चिपडे, अक्षय चौधरी ,अतुल खुरपडी, दीपक खुरपडी ,राहुल माकडे यांनी रक्तदान करीत रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सरपंच सचिन डांगे म्हणाले रक्तदान हे सर्वात महान श्रेष्ठ दान आहेत त्याकरिता रक्तदान एक चळवळ समजून तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.