नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत तरोडी पुलाचे वर आउटर रिंग रोडवर, ट्रक क. आर.जे ११ जि.बी ६३५४ चा चालक नामे मियाज मोहम्मद अनवर खान वय ४४ वर्ष रा. हसनपूर नोहू जि. नऊमेवत, हरीयाणा याने त्याचे ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे घटनास्थळी धोकादायकरित्या ऊभा केल्याने सलेंडर गाडी क्र. एम.एच ४० एल.व्ही ०९९० चा नालक नामे राकेश बंडू शेंडे वय २६ वर्ष रा. मुंडरी ता.मोहाळी जि. भंडारा हा त्याचे मोटरसायकल चालवितांना ट्रकचे मागील बाजुस धडकल्याने खाली पडुन गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारांकामी मेडीकल हॉस्पीटल येथे नेले असता तेथे डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. याप्रकरणी फिर्यादी मुकेश साहेबलाल पिछोडे, वय २७ वर्ष, रा. सि.सी चौक, वर्धा रोड, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि, ठाकरे यांनी आरोपी ट्रक चालकाविरूध्द कलम ३०४(अ) भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास करीत आहे.
प्राणांतीक अपघातास कारणीभूत ट्रक चालक आरोपी ताब्यात
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com