कन्हान ला देशी माऊझर व काडतुस सह नकुल पात्रे यास पकडले.

संदीप कांबळे, कामठी

– स्था. गुन्हे अपराध शाखा नागपुर ग्रामिण पथकाची कार्यवाही.

कामठी ता प्र 19 – कन्हान पोलिस स्टेशन अंतर्गत स्थानिय गुन्हे अप राध शाखा नागपुर ग्रामिण पथकाने पोलिस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात कन्हान उपवि भागात ऑपरेशन ऑल आऊट” मोहीम राबवित तार- सा रोड चौकात विना परवाना देशी बनावटीचे माऊझर बाळगुन असलेल्या नकुल पात्रे यास पकडुन पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्या त आले आहे.
मंगळवार (दि.१२) एप्रिल ला पोलीस स्टेशन कन्हान अप क्र २३२/२०२२ कलम ३६३ ३९४, ३४ भादंवि गुन्हा चे समांतर तपासा स्थानिय गुन्हे अपराध शाखा नागपुर ग्रामिण पथकाने करित कन्हान उपवि भागात फिरत असता गोपनीय माहिती मिळाली की, तारसा रोड चौक येथे नकुल संगम पात्रे हा अवैधरित्या देशी बनावटीचे लोखंडी माऊझर घेऊन फिरत आहे. अशी खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने तारसा रोडचौक येथे जाऊन नकुल संगम पात्रे वय ३२ रा. सत्रापूर कन्हान यास पकडुन त्यांचे ताब्यातून अवैद्यरित्या बिना परवाना एक लोखंडी देशी माऊझर व काडतूस किंमत ४६००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हा न पोस्टे ला गुन्हा दाखल करून आरोपी नकुल पात्रे व देशी बनावटीचे माऊझर सह पुढील कारवाई करिता कन्हान पेलीसाच्या स्वाधिन करण्यात आले. ही कार्यवाही स्था गुन्हे अपराध शाखा पथकाने नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, पोलीस उप अधिक्षक राहुल माखनीकर, नागपुर ग्रा. पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात सहा पोलीस उपनिरिक्षक अनिल राऊत, पोलीस हवालदार नाना राऊत, विनोद काळे, पो ना शैलेश यादव, पो शि विरेन्द्र नरङ, साहेबराव बहाळे आदीच्या पथकाने यश स्विरित्या पार पाडली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com