संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बस स्टँड चौकातील शवी रेस्टारेंट अँड बिअर बार समोर उधारीच्या पैश्यातून झालेला वाद हा विकोपाला गेल्याने आरोपीनी माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम यांचा मुलगा सुरज मेश्राम वय 35 वर्षे व त्याचा मित्राला चाकूने पोटावर तसेच हाताच्या बोटावर चाकूने गंभीर वार करून जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असून सुदैवाने जीवितहानी टळली असून दोन्ही गंभीर जख्मि नागपूर च्या मेयो इस्पितळात उपचार घेत आहे तर यासंदर्भात जख्मि फिर्यादी सुरज मेश्राम ने नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादवी कलम 307,504,143,144,148,34 अनव्ये गुन्हा दाखल केला असून दोन आरोपी अटकेत आहेत.अटक आरोपीचे नाव पवन बांडेबूचे वय 19 वर्षे रा टिळक नगर, कामठी,रझा खान वय 19 वर्षे रा कादर झेंडा,कामठी असे आहे तर अटकेबाहेर असलेल्या आरोपीत नयन ढोके वय 20 वर्षे रा इस्माईलपुरा कामठी,हर्षल उसरे वय 19 वर्षे रा वाडीपुरा जुनी कामठी तसेच इतर चार ते पाच आरोपीचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपीनी माजी नगरसेवक पुत्र जख्मि सुरज मेश्रामला मोबाईल फोन करून सदर घटनास्थळी बोलावणी केली.व उधारीच्या पैश्यातून वाद घालून अश्लील शिवीगाळ दिली यात जख्मि ने आरोपीला समजाव्याचा प्रयत्न केला असता दोघातही झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला जाऊन हाणामारीत गेला व आरोपीनी आपल्या हातातील धारदार चाकूने सुरज मेश्राम व त्याच्या मित्राच्या पोटावर चाकूने वार करून जख्मि केले.यात सुरज मेश्राम यांनी प्रतिकार केला असता त्याच्या डाव्या हाताच्या बोटावर ही चाकूचे वार आहेत. यात रक्तबंबाळ अवस्थेत दोन्ही जख्मि पोलीस स्टेशन ला पोहोचले असता पोलिसांनी त्वरित उपचारार्थ शासकीय रुग्णालयात हलविले व मात्र परिस्थिती नाजूक असल्याने मेयो इस्पितळात हलविण्यात आले.