महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली :- महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहेः

“महावीर जयंतीच्या या शुभ प्रसंगी मी सर्व देशवासियांना, विशेषतः जैन समुदायाच्या बांधवांना शुभेच्छा देत आहे.

महावीर जयंती हा भगवान महावीर यांचा जन्मदिवस अहिंसा आणि करुणा यांचे प्रतीक आहे. हा सण आपल्याला प्रेम आणि शांततेचा संदेश देतो. भगवान महावीर यांनी एका आदर्श आणि सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीसाठी अहिंसा, ब्रह्मचर्य, सत्य आणि त्यागाचा मार्ग दाखवला. त्यांची शिकवण मानव जमातीच्या कल्याणासाठी नेहमीच संयुक्तिक राहील.

या प्रसंगी आपण सर्वांनी समाजात प्रेम आणि सौहार्द पसरवण्याचा आणि देशाच्या विकासाकरिता समर्पित भावनेने काम करण्याचा संकल्प करुया”.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Nagpur-Mumbai special train disturbed everyone's sleep

Sun Apr 21 , 2024
– Message came 11 hours late Nagpur :- Those traveling from Nagpur to Mumbai had the happy news that the Nagpur-Mumbai special train would provide some relief in the journey. But the joy became palpable when the news came from the Railways that this special train would be delayed by 11 hours. The passengers lost their sleep after reading this […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com