‘नितीनजी आगे बढो… हम तुम्हारे साथ है’ – समर्थनाच्या घोषणांनी गाजली पश्चिम नागपूरची लोकसंवाद यात्रा

नागपूर :- ‘नितीन आगे बढो… हम तुम्हारे साथ है’, ‘कहो दिल से… नितीनजी फिर से’, ‘अब की बार चारसौ पार’, ‘फिर एक बार मोदी सरकार’ यासारख्या समर्थनाच्या घोषणांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची पश्चिम नागपूरची लोकसंवाद यात्रा गाजली.

फुटाळा येथील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ना. गडकरी यांनी यात्रेला प्रारंभ केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, माजी मंत्री परिणय फुके, माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी महापौर माया इवनाते, माजी महापौर संदीप जोशी, माजी नगरसेविका अश्विनी जिचकार आदींची उपस्थिती होती.

फुटाळा येथून भरत नगर, पश्चिम नागपूर भाजप कार्यालय, बागडी निवास या मार्गाने पांढराबोडीमध्ये यात्रेने प्रवेश केला. याठिकाणी स्थानिक नागरिकांनी फुलांचा वर्षाव करीत ना. गडकरी यांचे स्वागत केले. त्यानंतर पांढराबोडी पोलीस चौकी, इंदिरा गांधी रुग्णालय, डागा ले-आऊट, भगवती हॉस्पिटल, शंकरनगर बगिचा, शंकरनगर चौक याठिकाणी देखील आतषबाजी व फुलांचा वर्षाव करून यात्रेचे स्वागत करण्यात आले.

शिवाजीनगर बगीचा, गोकुळपेठ मार्केट, कॉफी हाऊस चौक, अलंकार टॉकीज चौक, लेंड्रा पार्क या मार्गाने धंतोली भाजप कार्यालयापुढे यात्रा पोहोचली. भाजप कार्यालयापुढे लोकसंवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुन्ना छालानी हे बग्गीवर सवारी करीत यात्रेमध्ये सहभागी झाले होते. लोहापूल मानस चौक, व्हेरायटी चौक, माहेश्वरी भवन या मार्गाने मुंडा देवल महादेव मंदिर येथे यात्रेचा समारोप झाला.

‘नितीनजी सेल्फी प्लीज’

पश्चिम नागपुरातील लोकसंवाद यात्रेत मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते बाईकवर सहभागी झाले होते. त्याचवेळी परिसरातील वसतीगृहे, महाविद्यालये, शिकवणी वर्गातील तरुण ना. नितीन गडकरी यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करीत होते. काही तरुणांनी तर ‘नितीनजी सेल्फी प्लीज’ असा आवाज देऊन गर्दीतही आपली इच्छा पूर्ण करून घेतली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रामस्वच्छता करुन ग्रामजयंती साजरी

Wed Apr 10 , 2024
नागपूर :- गुरुदेव सेवा मंडळ पेन्शन नगर नागपूर येथे ६ व ७ एप्रिल २४ ला ग्राम जयंतीची सुरुवात ग्रामसफाई ध्यान व प्रार्थना यांनी झाली. ग्रामजयंतीच्या निमित्याने स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल खापरी यांच्या सौजन्याने निशुःल्क डोळे तपासणी करून चष्म्याचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी साईबाबा भजन मंडळ सुंदर कांड रामायण पाठ करून सायंकाळी रवींद्र कुमार, गोंदेडा जिल्हा चंद्रपूर यांचे प्रवचन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!