जिवानीशी ठार मारणारे आरोपी चार तासाचे आत ताब्यात

नागपूर :-  फिर्यादी मनिष चंद्रशेखर मोहीते, वय ३६ वर्षे, रा. प्लाट नं. ५७९, लाकडीपुल रोड, महाल, नागपुर यांचा मित्र क. १) सनी धनंजय सरूडकर वय ३४ वर्ष रा. जलालपूरा, शारदा चौक, नागपूर यांचे नावावर आरोपी क. १) किरण शेंडे याने मोटरसायकल किस्तीवर विकत घेतली होती, परंतु त्याचे कडे किस्ती भरण्याचे पैसे नसल्याने, फिर्यादीचा मित्र सनी याचे कडुन हातउसने पैसे घेतले होते ते पैसे परत मागण्याकरीता फिर्यादी व फिर्यादीचा मित्र १) सनी सरूडकर, व २) कृष्णकांत उर्फ कुल्लू भट वय ३० वर्ष रा. नंदनवन, नागपूर असे आरोपी क. १ याचे घरी गेले होते. याच कारणावरून आरोपी क. १ व त्याचा भाऊ व दोन साथीदार यांनी संगणमत करून, फिर्यादीचा मित्र १) सनी सरूडकर, २) कृष्णकांत उर्फ कुन्नू भट यांचे सोबत साईबाबा नगर खरबी, येथे भांडण करून त्यांना जिवानीशी ठार मारण्याचे उद्देश्याने लाकडी राफ्टर व दगडाने मारून गंभीर जख्मी केले व फिर्यादीस तेथुन निघुन जाण्यास सांगीतले जख्मी यांना मेडीकल हॉस्पीटल येथे नेले असता फिर्यादीचे दोन्ही मित्रांना डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पो. ठाणे वाठोडा येथे पोउपनि पारकर यांनी आरोपाविरुध्द कलम ३०२, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता

पोलीस उपायुक्त परिमंडळ क. ०४ चे सि.आय यु. पथकाचे अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस ठाणे वाठोडा येथील तपास पथकांचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयातील आरोपीचे नाव निष्पन्न करून आरोपी क. १) किरण शेषराव शेंडे वय ३२ वर्षे, २) गोगेश शेषराव शेंडे वय २५ वर्षे, दोन्ही रा. साईबाबा नगर वाठोडा, ३) विकास उर्फ विक्की राजकुमार कोहरे, वय २० वर्षे रा. राणीशक्ती सोसायटी, पारडी, नागपुर व त्यांना एक सागीदार विधिसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फसवणुक करणाऱ्या आरोपींना अटक

Sat Feb 3 , 2024
नागपूर :- फिर्यादी दमयंती समशेर बहादुरसिंग वय ६९ वर्ष रा. गिरीपेठ, सिताबर्डी, नागपूर हया त्यांचे घरातील कुकर दुरूस्ती करीता आल्या असता, पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत बैंक ऑफ बडोदा, गिरीपेठ ते गायत्री भोजनालय दरम्यान त्यांना दोन अनोळखी आरोपी ईसम भेटले. आरोपींनी फिर्यादीला विश्वासात घेवुन सांगीतले की त्यांना गरीब मुलाची मदत करायची आहे असे म्हणुन फिर्यादीस भोजनालयाकडे नेले व फिर्यादी कडे एक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com