नागपूर :-गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे अजनी हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून आरोपी अर्जीक्य दिलीप जासुतकर, वय ३३ वर्षे, रा. हनुमान नगर, महात्मा गांधी गार्डन जवळ, अजनी, नागपूर याचे घरी रेड कारवाई केली असता, आरोपी हा आय.पी.एल मधील रॉयल चैलेन्जर बैंगलोर विरुध्द राजस्थान रॉयल यांचे दरम्यान चालु असलेले लाईव्ह किकेट मॅचवर सट्टयावी खायवळी करतांना प्रत्यक्ष मिळुन आला. आरोपीचे ताब्यातुन एक मल्टीमिडीया मोबाईल, तिन ऑनलाईन मोबाईल, टिव्ही, सेटऑप बॉक्स, लॅपटॉप, सट्टा-पट्टीचे कागदपत्र, कॉम्प्युटर, प्रिंटर व ईतर साहित्य असा एकुण ५६.२१०/- रू. या मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द पोलीस ठाणे अजनी येथे कलम ४, ५ जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा पोलीस आयुक्त गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. मुकुंद ठाकरे, पोउपनि. देवकाते, सफौ ईश्वर खोरडे, पोहवा अमोल आसुद, अनुप तायवाडे, संतोष गुप्ता, प्रविष्ण लांडे, नापोअं. संतोष चौधरी व पोर्भ मनिष रामटेके यांनी केली.