अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई 

नागपुर :- दि. ०८/०५/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीत पेट्रोलिंग करीत असता गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीत सिल्लेवाडा येथे राहणारा सुरेश प्रजापती हा आपले जवळ अवैधरीत्या अग्नीशस्त्र (माऊजर) बाळगून रात्री दरम्यान काहीतरी गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने मोटार सायकलने फिरत आहे यावरून आरोपी नामे- सुरेश बिजावर प्रजापति, वय ३५ वर्ष, सिल्लेवाडा यास नाकाबंदी करून त्याला थांबवुन त्याची पंचाचे समर्थ अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून १) एक नाऊज़र दोन कारतूस सह मिळुन आला. सदर हत्यारा बाबत आरोपीला परवाना विचारला असता त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे मिळुन आले नाही. आरोपीच्या ताब्यातून १) एक माऊजर दोन कारतुस सह किंमती अंदाजे ४०,०००/-. २) दोन कारतूस किंमती अंदाजे २०००/- रु. ३) एक मोटारसायकल किंमती अंदाजे १५,०००/- रु. असा एकूण ५७०००/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन खापरखेडा येथे कलम ३, २५ ऑर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे…

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात परी पोलीस अधिक्षक अनिल म्हस्के, परी पोलीस उपअधीक्षक राहुल झालटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, नाना राऊत, इकबाल शेख, पोलीस नायक विरू नरड, मोनु शुक्ला यांचे पथकाने केली..

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com