दक्षिण पश्चिममध्येही परिवर्तनाची लहर ; विकास ठाकरेंच्या आशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत

नागपूर :- वाढलेल्या महागाईची झळ प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे काही विशिष्ट परिसरात रंगरंगोटी करुन विकासाच्या नावावर आभासी चित्र निर्माण करण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न आता उघडले पडले आहे. आता नागरिकांना जमिनीशी जुळलेला आणि त्यांच्या समस्या समजून त्या सोडविणारा नेता हवा असल्याने शहरभरासह दक्षिण पश्चिममध्येही परिवर्तनाची लहर असल्याचे नागरिकांनी सांगितले.

इंडिया आघाडीतील भारतीय काँग्रेसपक्षाचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी बुधवारी नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ठिकठिकाणी जन आशीर्वाद यात्रेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. यात्रेत प्रामुख्याने बबनराव तायवाडे, प्रफुल्ल गुडढे पाटील, राजश्री पन्नासे, शहाणे, पंकज निघोट यांच्यासह मोठ्यासंख्येत पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आज गुरुवारी (ता. ४ एप्रिल) रोजी सकाळी ७.३० पासून उत्तर नागपुरात इंडिया आघाडीच्या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी सात वाजता छोटा ताजबाग रघुजीनगर येथे सायंकाळी ७ वाजता तर केडीके कॉलेजजवळ सायंकाळी ८ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

रिपब्लिकन पक्षाचा इंडिया आघाडीला पाठिंवा

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी रिपब्लिकन पक्ष (खोरीपा)ने इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असून पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागपूर लोकसभा निवडणूकीसाठी विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ परीश्रम घेत आहेत.

ठाकरेंच्या प्रचारार्थ आज पटोलेंसह इंडिया आघाडीचे नेते नागपुरात

इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास पांडूरंग ठाकरे यांच्या प्रचारार्थ छोटा ताजबाग रघुजीनगर येथे सायंकाळी ७ वाजता तर केडीके कॉलेजजवळ सायंकाळी ८ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इंडिया आघाडीतील दिग्गज नेते नागपूरात प्रचार सभांना संबोधित करतील. यासाठी इंडिया आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परीश्रम घेत असून हजारोंच्या संख्येत नागरिक सभेत पोहोचणार असल्याचा विश्वास इंडिया आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला आहे. प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तमेवार, माजी मंत्री सतिश चतुर्वेदी, माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत, आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह आधी नागपूरकरांना संबोधित करतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणूक : आज 4 उमेदवारांनी दाखल केले नामांकन

Thu Apr 4 , 2024
यवतमाळ :- यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज दिनांक 3 एप्रिल रोजी एकून 4 उमेदवारांनी एकून 5 नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे दाखल केले. नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये संजय उत्तमराव देशमुख, पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकून 2 अर्ज, धरम दिलीपसिंग ठाकूर, पक्ष सन्मान राजकीय पक्ष 1 अर्ज, संगिता दिनेश चव्हाण, अपक्ष 1 अर्ज, विशाल शालीकराम वाघ, गोंडवाना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!