नागपूर :-दिनांक १२.०३.२०२४ चे २०.३५ वा. चे सुमारास, गोपालदास भगवानदास खिलवानी वय ५९ वर्ष रा. लालपेठ कॉलोनी, चंद्रपूर, ता. जि. चंद्रपूर हे पोलीस ठणे हिंगणा हद्दीतुन अंबीका हॉटेल अॅण्ड बार, डोंगरगाव, वर्धा रोड, नागपूर येथुन रोडने पायदळ जात असतांना शिवशाही बस क. एम. एच ०६ बी.डब्लू ३६२२ चे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे, हयगईने चालवुन गोपालदास खिलवानी यांना धडक देवुन गंभीर जखमी केले, जखमी यांना उपचारकामी एम्स हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. याप्रकरणी फिर्यादी चेतन हरीशचंद्र बुधवावरे, वय ४२ वर्षे रा. हिंगणा, नागपूर यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पो. ठाणे हिंगणा येथे पोउपनि नागलोत यांनी आरोपीविरूध्द कलम २७९, ३०४(अ) भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास करीत आहे.