लोकजीवन ने केले नेताजींचे स्मरण 

बेला : लोक जीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नेताजी  सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनिल मुलेवार होते.उपमुख्याध्यापक मिलिंद साव, राजेंद्र तळवेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

विद्यार्थी हिमांशू गिरहेपुंजे, आर्यन कस्तुरे. अथर्व् झाडे, आर्यन गवळी, मनिष हेदाऊ, लावण्य कोहाड, सक्षम डेहणे, पार्थ बानकर यांनी जवानाची वेशभूषा धारण केली होती व त्यांनी नेताजींच्या घोषणा दिल्याबद्दल त्यांना अतिथींनी गौरविले .

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातत्र्य लढ्याविष्यी आवेशपूर्ण भाषण शास्वेद झाडे राजश्री राठोड यांनी दिले.

प्रास्तविक भाषणात लक्ष्मण खोडके यांनी स्वातत्र्य सेनानी हे देश रक्षणासाठीच जन्म घेतात. असे लढ्वये माताच निर्माण करू शकतात असे विचार व्यक्त केले.प्रा राजेंद्र तळवेकर यांनी युवा शक्ती जागृत होणे गरजेचे असे उदगार काढले. प्राचार्य मुलेवार यांनी महविविद्यालयीन विद्यार्थ्यांना सैनिक बनण्याची प्रेरणा दिली.

यशस्वीतेसाठी गिरीधर मेश्राम, आरती मुलेवार, दुशिला गजभिये, जयदेव वाढीवे, उत्तरा चिकराम, निलिमा मेंघरे, पल्लवी गायकवाड, वैभव झाडे, उकेश सातपुते, पितांबर मेंघरे, ज्ञानेशोर महाले, विशाल कांबळे कार्यक्रमाचे आयोजन संचालन लक्ष्मण खोडके तर आभार प्रा. नितिन पुरी यांनी मानले.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com