संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- रस्ता वाहतूक सुरक्षित रहावी यासाठी वाहतुकीचे नियम लागू करण्यात आले आहेत त्याचे पालन करणे गरजेचे आहे तसेच पालन न करणाऱ्याना दंड आकारणी करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे परंतु वाहतूक पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षित पणामुळे कामठी शहरात वाहतुकीचे नियम कागदावरच आणि बेशिस्तपणा!असे उघडपणे पहावयास मिळत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रस्ता अपघात टाळता यावा,वाहतूक सुरक्षित राहावी यासाठी वाहतुकीचे नियम लागू करण्यात आले आहे.या नियमाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस व वाहतुक नियंत्रण शाखा कार्यान्वित आहे मात्र वाहतुकीच्या नियमांचे उघडपणे वाहन धारकाकडून तिलांजली दिली जात आहे तर दुसरीकडे येथील स्थानिक वाहतूक पोलीस या सर्व प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.
कामठी शहरातील बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत चालली आहे.एवढेच नव्हे तर बेशिस्त वाहन पार्किंग,वाहतुक या कारणामुळे कामठी शहरातील सर्वच रस्त्यावर वाहतुकीचे कोंडी होत असल्याने मोठी डोकेदुखी झाले आहे.तर शहरातील बेशिस्त वाहतुकदार पोलिसांच्या कार्यवाहिपासून भयमुक्त झाले आहेत.