संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात राशन दुकानातुन लाभार्थी शिधापत्रिका धारकाना मोफत तांदळाची विक्री केली जाते . लाभार्थी तांदूळ घेऊन दुकानाबाहेर पडत नाही तोच अवैध तांदूळ विक्रेता चढ्या भावाने जवळपास 15 रुपये किलोने तांदूळ खरेदी करतात.यात काही लाभार्थी अपवाद ठरू शकतात.हा प्रकार बिनधास्तपने सुरू असून याबाबत पुरवठा विभागाला माहिती आहे मात्र मिळत असलेल्या हिस्स्याचा वाटामुळे सगळे ऑल इज वेल सुरू आहे.रेशनच्या तांदळाचा काळाबाजार हा सर्वश्रुत असताना संबंधित विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष पुरवीत आहे.तेव्हा या काळाबाजाराचा तांदूळ जातो तरी कुठे?असा प्रश्न येथील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.मात्र हा रेशनचा खरेदी केलेला तांदूळ लाभार्थी शिधापत्रिकाधारका मार्फत 15 रुपये किलोने खरेदी केल्यानंतर दलाला मार्फत राईस मिल मध्ये पाठवून त्याला पॉलिशिंग करून हाच रेशनचा तांदूळ 70 रुपये किलो दराने सर्रास बाजारात विक्रीला येत आहे तर ह्या तांदूळ विक्रीच्या काळ्या बाजारातुन तांदूळ माफियांचे चांगलेच फावले जात आहे तर यात सर्वसामान्य ग्राहकाची फसगत होत आहे.
पुरवठा विभागाच्या वितरण व्यवस्थेत कामठी तालुक्यात गव्हाची जास्त गरज असताना लाभार्थी शिधापत्रिका धारकांना तांदूळ जास्त मिळत आहे.तर तांदळाची कमी गरज असताना जास्त प्रमाणात तांदळाचे वितरण करण्यात येते. त्यामुळे अतिरिक्त तांदूळ हा काळ्या मार्गाने खुल्या बाजारात जात आहे,लाभार्थी शिधापत्रिका धारक मोफत घेतलेले तांदूळ 15 रुपये किलोने विकताहेत यामुळे यात लाभार्थ्याचा फायदा तर होतोच परंतु यापेक्षाही जास्त व्यापारी आणि पुरवठा विभागाच्या पांढरा पेशा यंत्रणेला मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत आहे.तेव्हा या प्रकारामुळे हा काळ्या बाजारातील तांदूळ थेट सर्वसामान्य ग्राहकाच्या माथ्याला हा कळकळीचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.त्यामुळे तहसिलदार अक्षय पोयाम तसेच पुरवठा विभागाचा वरिष्ठांनी याबाबत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.