आपल्या या महाराष्ट्रात खर्या अर्थाने बदनामी पाठीशी, रिस्क गाठीशी आणि प्राण तळहातावर घेऊन लढण्याची हिम्मत ज्यात आहे मला वाटते त्यानेच गृह खात्याची जबाबदारी स्वीकारवी, कोणत्याही सत्कार्यात कुठलीही मोठी रिस्क घेण्यात ज्याला मजा येते ते महाशय अर्थातच देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारांचा खात्मा करून शांतता प्रस्थापित करण्यापेक्षा गुन्हेगारांच्या हृदयाचे परिवर्तन कदाचित तुम्हा आम्हा सर्वसामान्यांच्या नकळत फडणवीस यापद्धतीने गृह खाते अनेकदा हाताळतात. मला गृह खात्यात काम करणारे काम केलेले कितीतरी अनुभवी अनेकदा विविध उदाहरणे देऊन सांगतात, अगदी साध्या पोलीस शिपायापासून तर थेट सिनियर आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांपर्यंत मी अनेकदा फडणवीस आणि गृह खाते त्यावर त्यांच्याशी बोलतो ज्यातून मी हा नेमका अर्थ काढला आहे कि गुन्हेगारांचा खात्मा ऐवजी गुन्हेगारांचे मन मत परिवर्तन, हीच फडणवीसांच्या नेमक्या कामाची पद्धत असते त्यातूनच हल्ली हल्ली हेच फडणवीस गडचिरोलीत जेथे नेमका मोठ्या प्रमाणवर नक्षलवाद्यांचा प्रभाव आणि मुक्काम आहे असतो सतत वावर असतो तेथे केवळ जाऊन आले नाहीत तर थेट तेथे मुक्काम करून आले. विशेष म्हणजे जे नेमके नक्षलवाद्यांना आवडत नाही, विविध विकासाच्या योजना तेथे जाहीर करून आले आणि काही उदघाटने देखील त्यांनी उरकलीत वरून मी येथे पुनःपुन्हा येईन हेही सांगून आले. ज्यांना आजपर्यंत अजिबात कधी जमले नाही ते तेथे त्यांनी केले, फडणवीस आदिवासी मंडळींमध्ये रमले त्यांना विश्वास दिला आणि आपलेसे केले. मन परिवर्तन हा त्यांचा गृहमंत्री म्हणून नेमका दृष्टिकोन पण एका गालात मारली म्हसणून दुसरा गाल पुढे करणारेही ते नाहीत, संघाचे ते त्यांना अशी गांधीगिरी मान्य नाही, गुन्ह्याच्या मर्यादा कोणीही ओलांडल्या कि मग समोरचा कोणीही असो कितीही जवळचा किंवा कितीही ताकदवान असो, कुठल्याही जात धर्माचा असो, अशावेळी फडणवीस कसे आक्रमक होतात, मीरा रोड प्रकरणी त्यांची बेधडक भूमिका, तुम्ही आम्ही अगदी उघड्या डोळ्यांनी हल्ली हल्ली बघितलेली आहे. गुन्हेगार किंवा गुन्हेगारी वृत्ती वृत्ती त्यांच्यासमोर टिकायची नाही, आता साऱ्यांच्याच ते बरे झाले लक्षात आलेले आहे, मीरा रोड परिसरात केवळ काही दिवसात कायमस्वरूपी शांताता नांदते आहे, वादळापूर्वीची तेथे आता अजिबात शांताता नाही…
जानेवारी महिन्यात एका मौंज सोहळ्यात माझी निवृत्त पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी भेट झाली, क्षणार्धात मी ओळखले ते टेन्शनफ्री आहत त्यानंतर पुढल्याच काही दिवसात त्यांच्या अंगलट आलेल्या अग्रवाल प्रकरणातून ते आणि त्यांचे त्यावेळेचे सहकारी पराग मणेरे सहीसलामत निर्दोष बाहेर आले आहेत, माझ्या हाती तसे पुरावे आले. विशेषतः व्यक्तिगत सूड उगवण्याच्या भूमिकेतून त्यावेळेचे गृहखात्याचे मंत्री आणि वादग्रस्त पैसेखाऊ नेते अनिल देशमुख, व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना परमबीर सिंग आणि पराग मणेरे टेन्स होते मोठ्या अडचणीत सापडले होते काहीसे बदनाम देखील झाले होते, श्यामसुंदर अग्रवाल यांच्याकडून खंडणी उकळण्यात पराग मणेरे आणि परमबीर सिंग यांचा हात होता सहभाग होता असे या दोघांवर जेव्हा थेट आरोप ठेवण्यात आला तेव्हा सुरुवातीला मला वाटले कि आता या दोघांचे करिअर आणि त्यांच्या कुटुंबाचे व्यक्तिगत आयुष्य नक्की अस्ताला आले आहे एवढे काळजीचे ते प्रकरण होते किंबहुना परमबीर सिंग आणि पराग मणेरे ज्यांना मी बऱ्यापैकी जवळून ओळखतो ते या पद्धतीच्या चुका कशा करू शकतात त्यावर आधी नवल वाटले नंतर त्या दोघांचा मनापासून राग देखील आला. मी किंवा विक्रांत यापद्धतीच्या जवळपास साऱ्याच लहान मोठ्या अधिकाऱ्यांच्या अनेकदा संपर्कात असतो किंबहुना अनेकांशी यासाठी मैत्रीचे सूर जुळतात कारण इतर बहुसंख्य पत्रकारांसारखी आम्हाला मैत्रीच्या मोबदल्यात दलाली करायची नसते ज्याचे राज्यकार्त्यांना व नेत्यांना मंत्र्यांना अप्रूफ वाटते, नेमकी माहिती घेणे हा एकमेव उद्देश ओळखीमागे असतो जो क्वचित संतोष प्रधान सारख्या निर्मोही पत्रकाराला जमतो…
वादग्रस्त श्यामसुंदर अग्रवाल किंवा त्यांचा पुतण्या शरद मुरलीधर अग्रवाल तसे बांधकाम क्षेत्रातले पट्टीचे खिलाडी त्यामुळे परमबीर सिंग किंवा पराग मणेरे यांच्याशी भिडताना किंवा या दोघांना तब्बल नऊ कोटी रुपयांच्या जाणूनबुजून खंडणी प्रकरणी गोवतांना त्यांना पुढली कसलीही भीती वाटली नाही किंबहुना त्यावेळेचे काही राज्यकर्ते मोठ्या खुबीने या अग्रवाल काका पुतण्याच्या पाठीशी उभे होते, विशेषतः त्यावेळेचे गृह मंत्री ज्यांना या पद्धतीने वादग्रस्त वागण्याने आयुष्याची मोठी किंमत मोजावी लागली ते अनिल देशमुख काही आयपीएस अधिकाऱ्यांना हाताशी धरून परमबीर सिंग यांना छळत होते, परमबीर यांचा भक्त किंवा लॉयलीस्ट सहकारी म्हणून मोठा जाच त्या पराग मणेरे यांना सतत सहन करावा लागत होता पण नेमके सत्य न्यायालयासमोर उघड झाले आणि एकदाची हि अग्रवाल प्रकरणी असलेली फाईल बंद झाली. आयपीएस अधिकारी पराग मणेरे जर एवढे खालच्या पातळीवर उतरणारे असते तर आजच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या ठाणे जिल्ह्यात अगदी अलीकडे महत्वाचे पद दिले नसते किंबहुना पुढल्या काही दिवसात हेच पराग मणेरे जर राज्याच्या आर्थिक गुन्हे विभागाचे प्रमुख म्हणून नेमले गेल्यास मला त्यात काही गैर किंवा अजिबात आश्चर्य वाटणार नाही, मणेरे यांनी कायम सावध असावे अर्थात मैत्री खातर प्रसंगी आयुष्य देखील देणार्या पराग मणेरे यांना ज्ञानाचे डोस पाजून फारसा उपयोग नाही, त्यांना यारों का यार म्हणून ओळखल्या जाते….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी