नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत प्लॉट नं. १०६, चिटनीस नगर, शिवसेना चौक जवळ, राहणारे फिर्यादी कुणाल जागेश्वर मेश्राम वय ३२ वर्ष, यांचे मुलीचा वाढदिवस कार्यक्रम असल्याने घरासमोर पेंडाल टाकलेला होता. पेंडाल दिसल्याने तेथे आरोपी १) पुजा उर्फ जोया लखन वर्मा वय २५ वर्ष २) तन्नू विजय मोरे वय ३४ वर्ष ३) ग्लोरी संध्या मल्हारी वय २२ वर्ष सर्व रा. प्लॉट नं. ६२, मिलींद नगर, बहादुरा रोड, व अॅटो चालक यांनी संगणमत करून अॅटोने फिर्यादीचे घरी पेंडाल मध्ये येवुन फिर्यादीस मुलीचे वाढदिवसा निमीत्त बक्षीस म्हणुन १०,०००/- रू ची मागणी केली. फिर्यादी यांनी ऐवढी मोठी रक्कम देवु शकत नाही असे म्हणुन स्वखुशीने ५००/- रू दिले असता, आरोपी यांनी ? 0 / (- F) खंडणी मागुन, शिवीगाळी व तमाशे करून, फिर्यादीस हातबुक्कीने मारहाण केली व निघुन गेले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून, पो. ठाणे नंदनवन येथे पोहवा विश्वजीत उईके यांनी आरोपींविरूध्द कलम ३८५, ३२३, ५०४, ५०६ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदवुन, आरोपींचा तपास पथकासह त्वरीत शोध घेवुन आरोपी क. १ ते ३ यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.