संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कोळसा व वाहना सह एकुण ४८६० रु मुद्देमाल जप्त.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत शहिद चौक येथुन वेकोलि खदान चा कोळसा चोरुन कारने वाहतुक करणाऱ्या आरोपी ला कन्हान पोलीसांनी पकडुन मुद्देमाल जप्त करित पोस्टे ला गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.२४) सप्टेंबर ला दुपारी १२ वाजता दरम्यान फिर्यादी शुभम क्षीरसागर बाजारे वय २८ वर्ष, रा. एकमत नगर बेसा रोड नागपुर हे इंदर कामठी काॅलरी खदान परिसरात पेट्रो लिंग करित असतांना मारोती कार क्र.एम एच ३१ / बीवी – २२०४ मध्ये एक इसम खदान मधुन कोळसा कार मध्ये भरुन चोरुन नेतांना दिसुन आल्याने शुभम बाजारे याने पाठलाग केला असता कार चालक मिळुन आला नाही. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली असता पोलीसांनी कार चालक आरोपी विजय धनोटे वय २५ वर्ष रा. कांद्री कन्हान याला शहीद चौक कन्हान येथे पकडुन शुभम बाजारे यांना माहिती दिली. पोलीसांनी व सुरक्षाकर्मी यांनी वाहनाची पाहणी करु न वाहना मध्ये असलेला कोळसा कोल डेपो मध्ये वजन काटा केले असता कोळशाचे वजन ८१० किलो किंमती ४८६०/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करून कन्हान पोलीसांनी फिर्यादी शुभम बाजारे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी विजय धनोटे विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार सदाशिव काटे, महेंद्र जळीतकर हे करीत आहे.