नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कॅरम स्पर्धेचे मंगळवारी (ता.२३) उत्तर नागपूर क्रीडा संकुल अहुजा नगर येथे माजी आमदार डॉ. मिलींद माने यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
याप्रसंगी भोजराज डुंबे, स्पर्धेचे कन्वेनर नागेश सहारे, समन्वयक महेंद्र धनविजय, गणेश कानतोडे, धैर्यशील वाघमारे, मोहम्मद इकबाल, मुकुंद नागपुरकर, शिवनाथ पांडे, अमित पांडे, राजेश हाथीबेड, आकाश जटोले, राजेश सांगोळे, कैलाश कोचे, शिवचरण यादव, के.आर. चव्हाण, खेमराज दमाहे, सुजीत चौरसीया आदी उपस्थित होते.
उद्घाटनीय सामन्यात पुरूष एकेरीमध्ये व्हीबीएस च्या मोहम्मद इब्राहिम ने कनिष्का संघाच्या लोकेश वासनिकला 23-20 ने मात देत विजय मिळविला. दुस-या सामन्यात छोटा जेबीकेएमच्या साहिलने जेबीकेएमच्या अंकीत देवकरला 25/1-25/0 ने मात दिली. जाफर कलीम विरुद्ध सर्वंश मोहारीया यांच्यातील सामन्यात जाफर कलीमने 25/8-25/7 असा विजय मिळविला. अशफाक बेद ने नितीन सिपायी यांचा 20/13, 13/18, 18/9 असा पराभव करीत विजय मिळविला. एनएमसीच्या सन्नी चंद्रीकापुरे आणि व्हीबीएस च्या राकेश कनोजीया यांच्यात झालेल्या सामन्यात सन्नीने 25/8, 0/20, 25/4 असा विजय मिळवून विजयी सुरूवात केली.