खापरखेडा :- अंतर्गत ०५ कि. मी. अंतरावरील पिपळा फाटा येथे दिनांक १२/०१/२०२४ से १३.२५ वा. ते १४.०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन खापरखेडा येथील स्टाफ यांना गोपनीय माहीती मिळाली की, पिपळा फाटा येथून अवैधरित्या रेती उत्खनन होत आहे. या माहिती वरून फिर्यादी स्टाफसह पिपळा फाटा येथे गेले असता बोलेरो पिकप चालक आरोपी नामे-१) आकाश संजय धुर्वे, वय २१ वर्ष रा. वार्ड क्रमांक एक चिचोली हा आपल्या ताब्यातील बोलेरो पिकपने अवैधरित्या विनापरवाना चोरटी रेतीची वाहतूक करतांना मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकप क्रमांक एम एच ४०/सी डी. ५३९० अंदाजे किंमती ४,५०,०००/- रुपये व अंदाजे एक ब्रास रेती अंदाजे किंमती ४०००/- रुपये असा एकूण ४,५४,०००/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीविरुद्ध तसेच गाडी मालक नामे २) कार्तिक वेलस्वामी एसने, वय २२ वर्ष, रा. वार्ड क्रमांक एक चिचोली याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर प्रकरणी सरतर्फे फिर्यादी नामे पोहवा शैलेश यादव पोस्टे खापरखेडा यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपीताविरुध्द कलम ३७९, १०९ भा.द.वि. सहकलम ४८(८) महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनास्थळी सपोनि राउत पोस्टे खापरखेडा यांनी भेट दिली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोहवा राठोड पोस्टे खापरखेडा हे करीत आहे.