एलपीजीसह पेट्रोलजन्य पदार्थांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई :- राज्यातील वाहतूकदरांच्या संपामध्ये पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी वाहतूकदारही सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी.चा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना केल्या आहेत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार एल.पी.जी., पेट्रोल व डिझेलचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये होतो. सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक व पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, एनएचएआयने समन्वय वाढवावा - उपमुख्यमंत्री अजित पवार 

Tue Jan 2 , 2024
मुंबई :- मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणासह विविध पूल आणि सेवा रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाश्यांना त्रास होतो. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक नियोजनासह आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने युद्धपातळीवर काम पूर्ण करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com