अरोली :- अंतर्गत १४ किमी अंतरावर मौजा मेजर हॉटेल समोर बाजारचौक निमखेडा येथे दिनांक २०/१२/२०२३ चे १०.०० वा. सुमारास यातील फिर्यादी नामे भारत खुशाल धुर्वे वय ४२ वर्ष, रा. बाणोर ता. मौदा याचा मामेभाऊ निलेश वरखडे रा. वाणोर हा गटाचे पैसे भरत नाही, ज्याच्या मायने दूध पिला असेल तो मला हात लावून दाखवेल असे बोलून फिर्यादीला शिवीगाळ केली व फिर्यादीसोबत भांडण केले, भांडणामध्ये आरोपी नामे- निलेश कुशन वरखडे, वय ४० वर्ष रा. बाणोर ता. मौदा जि. नागपुर याने फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मेजर हॉटेलचे बाजूला असलेल्या मनोहर अनकर याचे सलूनचे दुकानातून कैची आणून फिर्यादीच्या पोटावर मारून गंभीर जखमी केले.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे. अरोली येथे आरोपीविरुध्द कलम ३०७, ५०४ भादाँव, अन्वये गुन्हा नोंद केला आहे. यातील आरोपीस अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशिलकुमार सोनवाने हे करीत आहे.