अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या अशोक नगर येथील कुख्यात बदमाश तेनाली राऊत याचा राहत्या घराची कन्हान पोलीसांनी झडती घेतली असता अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याचे मिळुन आल्याने पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.४) जानेवारी ला सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान तेनाली राऊत रा. कन्हान हा आपल्या साथीदारसह धारदार शस्त्र घेऊन पुराण्या भांडण्याचा वादातुन मारण्याचा उद्देशाने अक्षय नाटकर यांचा घरी जावुन त्याला आणि त्याचा परिवाराला अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सपोनि राहुल डी चव्हान, पराग फुलझले, हरीष सोनभद्रे, आकाश सिरसाट, मुदस्सर जमाल, सम्राट वनपर्ती, निखिल मिश्रा, वैभव बोरपल्ले सह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोह चुन माहिती घेतली असता तेनाली राऊत याचा घरी धारदार शस्त्र असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी स्टाफ च्या मदतीने तेनाली राऊत याचा राहते घरी त्याचा शोध घेणे व घरझडती घेणे कामी गेले असता तेनाली राऊत याचे वडील संतोष नारायण मधुमटके वय ४९ रा. कन्हान व त्याची आई घरी मिळुन आल्याने पोलीसांनी घरी येणाचे कारण सांगुन घराची झडती घेतली असता आलमारीचे मागे धारदार चाकु, कोयता असे एकुण १२ लोखंडी शस्त्र मोठ्या मिळुन आल्याने पोलीसांनी जागीच पंचनामा करुन जप्त केले. आरोपी संतोष मधुमटके व तेनाली राऊत याची आई यांनी संगनमता ने जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी नागपुर यांचे कलम ३७(१) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्यवे काढलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन आपल्या राहत्या घरी अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याचे मिळुन आल्याने पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी नापोशि महेश बिसेन यांचा तक्रारी वरून आरोपी संतोष मधुमटके व आई विरुद्ध अप क्र. ६२/२४ कलम ४, २५, १३५ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी और वर्धा मार्ग पर कार्य गती से करे - श्रावण हर्डीकर

Tue Feb 6 , 2024
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना) • रेल विकास निगम के वरिष्ठ अधिकारीयो को प्रबंध निदेशक का आदेश  नागपूर :- कामठी और वर्धा मार्गपर मेट्रो का कार्य गती से शुरु करे जिससे जलदी इन मार्ग पर मेट्रो सेवा शुरु हो सकेंगी,यह आदेश महा मेट्रो के प्रबंध निदेशक श्रावण हर्डीकर ने रेल विकास निगम के वरिष्ठ अधिकारीयो को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com