नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभा कक्षामध्ये आज विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या लोकशाही दिनामध्ये एक तक्रार प्राप्त झाली.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकूण घेतले आणि उपस्थित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार महेश सावंत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.