नागपूर :- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे पेंशनर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी वासूदेव पात्रा यांची भारत पेंशनर समाज, नवी दिल्ली च्या उपाध्यक्षपदी (वेस्टन झोन) नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल पेेंशनर असोसिएशनचे अध्यक्ष डी.एन. मूतीं, सचिव पी. व्ही. रमन, मीना माकर्डे, ऍन्जीलीना फिलीप, डेझी अॅन्थोनी, दुष्यंत पाटील, पी.एस. दहीफोडे, लक्ष्मी राउत, पुष्पलता पिट्टलवार यांनी अभिनंदन केले आहे. पात्रा यांच्या नियुक्तीमुळे निवृत्त कर्मचार्यांना कार्यालयीन कामात मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नियुक्तीबद्दल त्यांनी भारत पेंशनर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आणि सी.एन. लांजेवार यांचे पात्रा यांनी आभार मानले आहे.
वासूदेव पात्रा यांची नियुक्ती
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com