नागपूर :- दिनांक १०.११.२०२३ रोजी मा. जिल्हा व अति सत्र न्यायाधीश कोर्ट क. १०, आर आर भोसले यांनी त्यांचे कोटींचे केस क्र. ३४० / २०२१ मधील पो. ठाणे एम.आय.डी.सी येथील अप. क. ६५/२०२१ कलम ३०२, ३४ भादवि या गुन्हयातील आरोपी क. १) पंकज चंद्रकांत कडु वय २७ वर्षे, रा. सोनेगाव, जुनी वस्ती, खामला रोड, नागपूर २) सरिता शेखर कनोजिया वय ४० वर्ष रा. शारदा नगर, प्लॉट नं. १०, जयताळा, नागपूर यांचे विरुद साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिध्द झाल्याने आरोपींना कलम ३०२, ३४ भा.दं.वि. मध्ये आजीवन सत्रम कारावासाची शिक्षा, व प्रत्येकी ८,५००/- रू दंड व दंड न भरल्यास ०१ वर्ष अतिरीक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.
दिनांक ०६.०२.२०२१ चे २१.०० वा. ते दि. ०८.०२.२०२१ चे १६.०० वा. चे दरम्यान आरोपी क. १२ यांचे प्रेमसंबंध असल्याने त्यांनी संगणमत करून आरोपी क. २ चे पती शेखर बबलू कनौजिया वय ४७ वर्ष रा. जयताळा, नागपूर यास डोक्यावर कोणत्यातरी वस्तुने मारहाण करून जिवानीशी ठार मारले. याप्रकरणी प्रथम मर्ग दाखल करण्यात आला होता मर्गचे चौकशी दरम्यान आरोपी क. १ व २ यांनी शेखर कनोजिया यास जिवानांशी ठार मारल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरूध्द पो. ठाणे एम. आय. डी. सी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोन्ही आरोपींना दि. १२.०२.२०२१ चे १७.३१ वा. अटक करण्यात आली होती.
सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी तत्कालीन वपोनि युवराज हांडे यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून अँड. लालावर शेन्द्रे यांनी तर आरोपी तर्फे अॅड. प्रफुल मोहगावकर यांनी काम पाहिले. सदर गुन्हयात कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा नितीन सिरसाट व नरेश मन्नेवार यांनी काम पाहिले.