मा. न्यायालयातुन आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा

नागपूर :- दिनांक १०.११.२०२३ रोजी मा. जिल्हा व अति सत्र न्यायाधीश कोर्ट क. १०, आर आर भोसले यांनी त्यांचे कोटींचे केस क्र. ३४० / २०२१ मधील पो. ठाणे एम.आय.डी.सी येथील अप. क. ६५/२०२१ कलम ३०२, ३४ भादवि या गुन्हयातील आरोपी क. १) पंकज चंद्रकांत कडु वय २७ वर्षे, रा. सोनेगाव, जुनी वस्ती, खामला रोड, नागपूर २) सरिता शेखर कनोजिया वय ४० वर्ष रा. शारदा नगर, प्लॉट नं. १०, जयताळा, नागपूर यांचे विरुद साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिध्द झाल्याने आरोपींना कलम ३०२, ३४ भा.दं.वि. मध्ये आजीवन सत्रम कारावासाची शिक्षा, व प्रत्येकी ८,५००/- रू दंड व दंड न भरल्यास ०१ वर्ष अतिरीक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

दिनांक ०६.०२.२०२१ चे २१.०० वा. ते दि. ०८.०२.२०२१ चे १६.०० वा. चे दरम्यान आरोपी क. १२ यांचे प्रेमसंबंध असल्याने त्यांनी संगणमत करून आरोपी क. २ चे पती शेखर बबलू कनौजिया वय ४७ वर्ष रा. जयताळा, नागपूर यास डोक्यावर कोणत्यातरी वस्तुने मारहाण करून जिवानीशी ठार मारले. याप्रकरणी प्रथम मर्ग दाखल करण्यात आला होता मर्गचे चौकशी दरम्यान आरोपी क. १ व २ यांनी शेखर कनोजिया यास जिवानांशी ठार मारल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरूध्द पो. ठाणे एम. आय. डी. सी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोन्ही आरोपींना दि. १२.०२.२०२१ चे १७.३१ वा. अटक करण्यात आली होती.

सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी तत्कालीन वपोनि युवराज हांडे यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून अँड. लालावर शेन्द्रे यांनी तर आरोपी तर्फे अॅड. प्रफुल मोहगावकर यांनी काम पाहिले. सदर गुन्हयात कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा नितीन सिरसाट व नरेश मन्नेवार यांनी काम पाहिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या आरोपींना अटक

Sat Nov 11 , 2023
नागपूर :- दिनांक १०.११,२०२३ ००.१० वा. ते ०१.०० वा. चे दरम्यान अंबाझरी पोलीसांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मिळलेल्या खात्रीशीर माहितीवरून फुटाळा तलाव, यह संगोपन केन्द्र, विहोरी कॅम्पस चौक, अमरावती रोड, नागपूर येथे रेड कारवाई केली असता, दरोडा टाकण्याचे तयारीत असलेले आरोपी क. १) प्रितेश उर्फ मणी नरेश विजवे वय २८ वर्षे, २) संदेश उर्फ संधा राजु […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com