– दृष्टिहिन विद्याथ्यांना ‘स्मार्ट’ बनविणार दीक्षाभूमी आंबेडकर कॉलेज !
नागपूर :- डॉ. आंबेडकर कॉलेज दिक्षाभुमी येथील, येत्या 30 नोव्हेंबर रोजी, हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन चेन्नई यांच्या वतीने अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार, स्मार्ट चष्मा आणि लॅपटॉपचे वितरण केल्या जाईल. ही मध्य भारतातील एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. ज्याची स्थापना 1964 मध्ये झाली. ही संस्था गेल्या वीस वर्षापासून सामान्य विद्यार्थ्यांनाच नाही तर दृष्टीहीन विद्यार्थ्यांनाही उत्तम शैक्षणिक सुविधा पुरवते. ही संस्था कॅम्पस मध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यामध्ये सॉफ्टवेअर, संगणक आणि कीबोर्ड यांचा समावेश होतो. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान वापरण्याचे आणि स्वावलंबी होण्याची प्रशिक्षण दिल्या जाते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर के. आनंद, यांची उपस्थिती राहणार आहे. आणि श्री नटराज शंकरन ट्रस्टी चेन्नई आणि जे. राधाक्रिष्णन सुद्धा उपस्थित राहतील. अशी माहिती प्राचार्य बी.ए.मेहेरे यांनी पत्रकारांना दिली. पत्रपरिषदेत प्राचार्य बी ए मेहेरे, जे राधाकृष्णन, प्रा. शैलेश बहादुरे आणि प्रा. रोहिण मेश्राम यांची उपस्थिती होती.