संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– मुख्याधिकारी संदीप बोरकर च्या प्रयत्नांना यश
कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येत अनुयायी येणार आहेत. तेव्हा तेथील अनुयायांच्या सोयीसाठी म्हणून मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी कामठी नगर परिषद च्या वतिने इतर सोयीसह आधुनिक पद्धतीच दोन मोबाईल टॉयलेटची खरेदी करूम उत्तम सोय केली आहे.
शहरात आयोजित उत्सव ,विविध कार्यक्रमासाठी मोबाईल टॉयलेटची आवश्यकता भासते. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी टॉयलेट मोबाईल व्हॅन गरजेचे असल्याने कामठी नगर परिषद च्या वतीने बायो डायजेस्टर मोबाईल टॉयलेट व्हॅन खरेदी करण्यात आली.आगामी दुर्गा उत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन ,ईद तसेच अनेक शासकीय योजनांच्या प्रचार कार्यक्रम ,आरोग्य शिबीर व इतर सण व उत्सव दरम्यान महिला व पुरुषांच्या टॉयलेट चा प्रश्न उद्भवतो यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून कामठी नगर परिषद च्या वतीने शहराच्या स्वछता हितासाठी 15 व्या वित्त आयोग निधीतून दोन फिरते बायो डायजेस्टर मोबाईल टॉयलेट व्हॅन खरेदी करण्यात आले.